• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

“…अन्यथा गय नाही!”; पांदण रस्ते व पाणी पुरवठा योजनांबाबत आमदार किशोर आप्पांनी अधिकाऱ्यांना दिला इशारा

पाचोऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत तालुका आढावा बैठकीचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 17, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
“…अन्यथा गय नाही!”; पांदण रस्ते व पाणी पुरवठा योजनांबाबत आमदार किशोर आप्पांनी अधिकाऱ्यांना दिला इशारा

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 17 जानेवारी : पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले शेत पाणंद रस्ते तसेच पाणी पुरवठा योजना या केवळ संबंधित अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या अनास्थेमुळे प्रलंबित राहत असून हे विषय प्राधान्याने पूर्ण करा. तसेच मार्च 2025 अखेरपर्यंत विविध कामांना गती न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांची तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पंचायत समिती पाणीपुरवठा कृषी, वीज मंडळ किंवा पोलिस प्रशासन कोणत्याही अधिकाऱ्यांची आपण गय करणार नाही, असा इशारा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आढावा बैठकीत दिला. पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात आज दुपारी 12 वाजता घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

पाचोरा तालुका आढावा बैठकीचे आयोजन –
पाचोऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज प्रांताधिकारी कार्यालयात शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कामे प्रलंबित विषय प्राधान्याने पुर्ण करावेत, अशा सूचना दिल्यात.

ग्रामसभेत ठराव करण्याच्या सूचना –
आगामी शिवजयंतीच्या आधी मतदार संघात उभारलेल्या शिवस्मारकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे बसविण्याची परवानगी मागणे कामी सर्व ग्रामपंचायतींनी आगामी 26 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव करण्याच्या सूचना सर्व सरपंच व ग्रामसेवकांना द्याव्यात, अशी सूचना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली.

किशोर आप्पांनी घेतला आढावा –
ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती, पर्यटन विकासाअंतर्गत बहुळा धरण, काकणबर्डी, पिंपळगाव हरेश्र्वर येथील हरिहरेश्वर यांचे मंदिर, पिंपळगाव (हरे) येथे नवीन बस स्थानक निर्मिती, गोठा शेड, ग्रामीण भागातील पुल, विजेचे सब स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण भागातील बस फेऱ्या,कृषी विभागाची जमीन, शहरातील मानसिंगका येथील खुला भूखंड व घरे, शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, शहरातील अतिक्रमित घरे आदी विषयांबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा जाणून घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

आमदारांनी अधिकाऱ्यांना केल्या सूचना –
आपली बांधिलकी जनतेशी असून शासन दरबारी अधिकारी वर्गास काही तांत्रिक अडचणी असल्यास त्यांनी निसंकोचपणे सांगाव्यात मात्र कायदेशीर बाजूंचा बाऊ करत जनतेला वेठीस धरू नये, अशा सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केली. बैठकीच्या सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल प्रथम सत्कार केला.

यांची होती उपस्थिती –
यावेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार बनसोडे, उपविभागीय आरोग्य अधिकारी डॉ.सतिष टाक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दीपक पाटील, मुख्याधिकारी मंगेश देवरे, लघु पाटबंधारे विभागाचे श्री. चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, पोलिस निरीक्षक अशोक पवार, पिंपळगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे, गटविकास अधिकारी समाधान पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षद मुलाणी, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक एम.व्ही. तोतावार, सहाय्यक निबंधक पाटील, आगार प्रमुख पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी लांडे, पशू वैद्यकीय अधिकारी, महिला बाल विकास विभागाच्या जिजा राठोड यांचेसह पाचोरा तालुक्यातील शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. यासोबतच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, माजी जि. प. सदस्य मधुकर काटे, बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, सुमित पाटील, समाधान पाटील, स्विय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीएम किसान योजनेसाठी आता कुटुंबाचे आधार बंधनकारक; नेमकी बातमी काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsmla kishor appa patilpachora newspachora taluka review meetingsdo bhushan ahiresuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

February 1, 2026
अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page