भडगाव, 17 नोव्हेंबर : भडगाव तालुक्यातील एका गावात मूकबधिर महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज त्या गावात पीडित महिलेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. दरम्यान, अटक केलेल्या आरोपीविरोधात फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, असे आमदार पाटील यांनी आश्वासित केले.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
भडगाव तालुक्यातील एका गावात 65 वर्षांच्या मूकबधीर भगिनीवर एका तरुणाने अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने गोंडगाव बालिका अत्याचार प्रकरणात फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून आरोपीला फासावर लटकविण्याचा प्रयत्न चालवला आहे. महिन्या-दोन महिन्यातच या प्रकरणाचा निकाल समोर येईल. आणि म्हणून अशाच पद्धतीने या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीच्याविरोधात फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवून पीडित महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
महिला-मुलींवर अत्याचार करण्याची प्रवृत्ती बळवणार नाही, याबाबत एसपी तसेच कलेक्टर आणि पोलिसांसोबत चर्चा करुन सूचना करण्यात आल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली.
नेमकं काय प्रकरण? –
भडगाव तालुक्यातील एका गावातील 65 वर्षीय मूकबधिर महिला ही अंगणात झोपली असताना गावातील 27 वर्षीय तरुणाने मध्यरात्री तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, महिलेने आरडाओरड केल्यानंतर नातेवाईक जागे झाले. मात्र, तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान, भडगाव पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली आहे.
हेही पाहा : Video : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार? कजगाव येथील जनतेशी थेट संवाद