पाचोरा, 24 फेब्रुवारी : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. आमदार किशोर आप्पा यांच्या शिवालय या निवासस्थानी आज 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
आज दुपारी अंत्ययात्रा –
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्यावर मागील काही दिवसांपासून प्रकृती अवस्थेमुळे उपचार सुरू होते. दरम्यान, आज त्यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून चिंतामणी कॉलनी भडगाव रोड पाचोरा येथुन आज दुपारी 3 वाजता निघेल.