ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 नोव्हेंबर : निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून विरोधकांकडून सातत्याने खोटे आरोप केले जात असून मतदारसंघातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अफवा पसरवून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. मात्र, विरोधकांच्या खोट्या अफवांना मतदारसंघातील जनता बळी पडणार नाही, असे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. त्यामुळे दररोज काहीतरी वेगवेगळे खोटे आरोप सेट करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. परंतु मला खात्री आहे की, माझ्या मतदारसंघातील सुज्ञ जनता तसेच मतदारबांधव या खोट्या आरोपांना बळी पडणार नाही.
आमदार पाटील पुढ म्हणाले की, अमोल शिंदे, वैशाली सुर्यवंशी आणि दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन पाचोरा शहरात शिवसेनेची गुंडगिरी होत असल्याचा आरोप केला आहे. आमच्या कार्यकर्त्याकडून गाड्या फोडल्याचा कांगावा केला जात असून युपी-बिहारमधून गुंड आणून दहशतवाद निर्माण केले जात असल्याचे खोटे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. दरम्यान, विरोधकांच्या एकाही खोट्या आरोपाला मतदारसंघातील जनता बळी पडलेली नाही, याचा मला सार्थ अभिमान असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून यानंतरही खोट्या वावड्या व अफवा पसरवण्याची शक्यता आहे. मतदान होईपर्यंत अशापद्धतीचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जाऊ शकतात. पाचोरा भडगाव हा मतदारसंघ शांतताप्रिय मतदारसंघ असून विरोधकांच्या खोट्या अफवांना बळी पडणार नाही. प्रशासनाने खोट्या अफवा पसरवणाऱ्या वाईट प्रवृत्तींचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. मतदारसंघातील जनतेने निर्भीडपणे मतदानाला जाऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असेही आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
हेही वाचा : Video : प्रचारतोफा थंडावल्या; आता उत्सुकता मतदानाची, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत विशेष संवाद