पाचोरा, 13 जुलै : पाचोरा शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज 13 जुलै रोजी दुपारी भेट देत परिसरातील नागरिकांसोबत थेट संवाद साधला. यावेळी परिसरात असलेल्या अडचणी समजून घेत महिलांनी केलेल्या परिसतील विकासकामांच्या मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज पाचोरा शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात भेट दिली आणि परिसरातील नागरिकांसोबत संवाद साधला. या संवादात महिलांनी कॉलनीतील ओपन स्पेसच्या कमतरता, सभामंडपाच्या सुविधेचा अभाव आणि कालिंका माता मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबतचा मुद्दे आमदारांसमोर मांडले. दरम्यान, आमदार पाटील यांनी प्रत्येक मुद्द्याकडे सहानुभूतीने आणि गंभीरतेने लक्ष देत संबंधित मागण्या पुर्ण करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी महिला- पुरूष वर्गासोबत जमिनीवर भारतीय बैठकीत बसून अतिशय सहजपणे संवाद साधला. या बैठकीचे विशेष म्हणजे कोणताही औपचारिकपणा न ठेवता महिलांच्या मागण्या ऐकून घेतल्या. आमदारांसोबत भारतीय बैठकीतील हा थेट संवाद महिलांमध्ये विश्वास निर्माण करणारा आणि आपलेपणाची जाणीव देणारा ठरल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख सुमित सावंत, चंद्रकांत धनवडे, महेश कौंडिण्य यांच्यासह परिसरातील महिला-पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.