• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

‘आता निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न!’, दिल्लीच्या निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 8, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
‘आता निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न!’, दिल्लीच्या निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला असून तब्बल 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळविण्यात यश प्राप्त झालंय. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या निकालाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्न राबविला गेलाय, ज्याचा परिणाम आजच्या निकालात दिसतोय. अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलीय. तो काहीकाळ चालेल अन् कालांतराने तो इतिहास जमा होईल, असेही राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांची निकालावर प्रतिक्रिया –
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस नेहमीप्रमाणे वेगळे लढले. पण यावेळेला शत्रू अधिक ताकतीने लढतोय, याचे भान ठेवले असते आणि आमच्या इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्ष एकत्र आले असते तर निश्चित आजचा निकाल वेगळा दिसला असता. काँग्रेस आणि आपने या संकट काळात एकत्र यायला पाहिजे होते, अशी आमचीही भूमिका होती. खरंतर, हरियाणात दोघे एकत्र आले नाही. त्यामुळे त्याचा फायदा भाजपला झाला. आणि दिल्लीतही तेच घडले, असे आजच्या निकालातून दिसतंय. दरम्यान, भाजप आणि आपमधील निकालाचे अंतर जास्त नसल्याचेही राऊत म्हणाले आहेत.

‘आता निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न!’ –
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत बोलताना, दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न राबविला गेला असल्याचे मी कालच सांगितले होते. एकेकाळी महाराष्ट्रात एसएससी बोर्डात लातूर पॅटर्न होतात. लातूरची विद्यार्थी महाराष्ट्रात अव्वल येत होती.

आता लातूर पॅटर्न कुठे आहे? खरंतर, आता निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्र पॅटर्न केला आहे. मात्र, ज्याप्रमाणे लातूर पॅटर्न संपला अगदी त्याचप्रमाणे भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न काहीकाळ चालेल अन् कालांतराने तो इतिहास जमा होईल, असेही राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, राजकारणात अघोरी प्रयोग केले जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय.

राजकारणात ‘महाराष्ट्र पॅटर्न’ यासारखे असे अघोरी प्रयोग केले जातात. मात्र, यावेळी संयमाने काम करण्याची गरज असते. आम्हालासुद्धा आता त्याचे जे मार्ग आहेत..त्याचा अभ्यास करावा लागेल आणि कार्यकर्त्यांना आता त्याबाबत मार्गदर्शन करावे लागेल. दरम्यान, भाजप हे कामाच्या बळावर निवडणूक जिंकत नाही. तर लोकांना धर्माची अफूची गोळी द्यायची आणि आपल्यासाठी मते मिळवून घ्यायची, असा त्यांचा प्रयत्न असतो, अशी टीकाही संजय राऊत यांनी भाजपवर केलीय.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत:

बातमी शेअर करा !
Share
Tags: delhi vidhansabha election 2025 resultmarathi newssanjay rautsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना मुख्यमंत्र्यांचे हस्ते विशेष पुरस्कार

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना मुख्यमंत्र्यांचे हस्ते विशेष पुरस्कार

March 28, 2026
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सीआयएसएफ जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सीआयएसएफ जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

March 28, 2026
रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदाचा राजनाम्यानंतर रोहिणी खडसेंची खोचक टीका; म्हणाल्या, “वैयक्तिक कारणांपासून सुरू………..!”

रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदाचा राजनाम्यानंतर रोहिणी खडसेंची खोचक टीका; म्हणाल्या, “वैयक्तिक कारणांपासून सुरू………..!”

March 28, 2026
राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 28, 2026
‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

March 27, 2026
गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

March 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page