• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home खान्देश

महावितरणचा ‘शॉक’; खान्देशातील 6 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, बड्या थकबाकीदारांची नावे आता जाहीर करणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 28, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, धुळे, नंदुरबार
MSEDCL's 'shock': Power supply disconnected for 6,000 customers in Khandesh; names of major defaulters will now be published.

महावितरणचा 'शॉक'; खान्देशातील 6 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, बड्या थकबाकीदारांची नावे आता जाहीर करणार

जळगाव, 28 डिसेंबर : जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात महावितरणने वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार आवाहन करूनही बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा चालू डिसेंबर महिन्यात खंडित करण्यात आला असून, आता या कारवाईची व्याप्ती अधिक वाढवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राजकीय वरदहस्त असलेल्या आणि आर्थिक संपन्न असूनही देयके न भरणाऱ्या ‘बड्या’ थकबाकीदारांची नावे आता सार्वजनिकरीत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याच्या हालचाली महावितरणतर्फे सुरू करण्यात आल्या आहेत.

जळगाव परिमंडलात सध्या थकबाकीचे संकट गडद झाले आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात कृषी वर्गवारी वगळता सुमारे साडेसहा लाख लघुदाब ग्राहकांकडे महावितरणची 1103 कोटी 23 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात जळगाव जिल्ह्यात 556 कोटी 53 लाख, धुळे जिल्ह्यात 322 कोटी 10 लाख व नंदुरबार जिल्ह्यात 224 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे, अनेक ग्राहकांनी वर्षभरापासून एक रुपयाचाही भरणा केलेला नाही. यामुळे महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

मुजोर ग्राहकांविरोधात कारवाईच्या सूचना –

मुजोर ग्राहकांविरोधात थेट पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्याच्या सूचना महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी परिमंडलातील सर्व अभियंत्यांना दिल्या आहेत.

तर वीजबिलासाठी रांगेत उभे रहायची गरज नाही.. –

गेल्या काही वर्षांत ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागू नये, त्यांचा वेळ वाचावा, यासाठी महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यूपीआय नेट बँकिंग, वॉलेट्स, मोबाईल अॅप्सवरील फोन पे, गुगल पे आणि महावितरणच्या वेबसाइटद्वारे घरबसल्या वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त होणार कारवाई –

थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. काही संवेदनशील भागांत कर्मचाऱ्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता, ही कारवाई आता पोलिस बंदोबस्तात केली जाणार आहे. महावितरणने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारची गुंडगिरी किंवा राजकीय दबावाला बळी न पडता ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कारवाई टाळण्यासाठी थकबाकी भरा.. –

महावितरणतर्फे थकबाकीदार ग्राहकांना थकित विजबिल भरण्याबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात येत असते. मात्र, तरीदेखील थकबाकी न भरणाऱ्या जळगाव परिमंडलातील सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा चालू डिसेंबर महिन्यात खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर मात्र हे ग्राहक लागलीच पैशांची जमवाजमव करून, काही तासांत वीजबिल भरतात. त्यानंतर पुन्हा महावितरणचे कर्मचारी या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करत आहेत.

बड्या थकबाकीदारांची ‘नावे’ होणार जाहीर –

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक धनवान व्यक्तींकडे लाखो रुपयांचे वीजबिल थकीत आहे. मात्र, वीजबिल भरण्याबाबत नोटीस बजावूनही संबंधितांकडून दाद दिली जात नाही. अशा ग्राहकांकडे महावितरणचे कर्मचारी कारवाईसाठी गेल्यावर राजकीय वजन वापरून कारवाई टाळण्याचा प्रकार केला जात आहे. त्यामुळे या बड्या थकबाकीदारांची नावे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. वृत्तपत्रांतून नावे प्रसिद्ध केल्यावर या थकबाकीदारांना ऐन निवडणुकीच्या वेळेस सामाजिक स्तरावरही चपराक बसणार आहे. अलिकडेच महावितरणने मनपा प्रशासनाला पत्र देऊन उमेदवारांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे.

जळगाव परिमंडल महावितरणचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचे आवाहन –

महावितरणतर्फे सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी तातडीने थकीत वीजबिल भरणे नियमाने गरजेचे आहे. अन्यथा महावितरणचे कर्मचारी कधीही त्यांच्या घरी जाऊन वीज पुरवठा खंडित करू शकतात. तसेच काही मोठ्या थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रातुन प्रसिद्ध करून, त्यांच्यावरही लवकरच कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे थकित वीज बिलभरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव परिमंडल महावितरणचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: i a mulanimahavitaranmahavitaran jalgaonmahavitaran jalgaon parimandal

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

February 17, 2026
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर

February 17, 2026
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

February 17, 2026
अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

February 17, 2026
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 17 फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 17 फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

February 16, 2026
पाचोरा तालुक्यातील पिंप्री सार्वे येथील तुळजाई शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

पाचोरा तालुक्यातील पिंप्री सार्वे येथील तुळजाई शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

February 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page