• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 17 फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 16, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 17 फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

मुंबई, 15 जानेवारी : देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ उपक्रमाची सुरूवात १७ फेब्रुवारीपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा जागतिक हवामान संवाद मुंबईत होणार आहे.

शहराला ग्लोबल साऊथमधील नागरिक-आधारित हवामान मंचाचे केंद्रस्थान देणारा हा उपक्रम पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सहकार्याने प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेने आयोजित केला आहे. यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे मुख्य सत्र जिओ कन्व्हेशन सेंटर, मुंबई येथे होणार आहे.

या तीन दिवसीय उपक्रमात तळागाळातील संस्था, विविध क्षेत्रातील नेते, उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ आणि धोरणकर्ते भारत व ग्लोबल साऊथमधील हवामान उपायांवर चर्चा करणार आहेत. जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व या मंचावर एकत्र येणार असून माजी अमेरिकन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ सौम्या स्वामिनाथन, उद्योग क्षेत्रातील एस्थर फिनिदोरी, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासह केंद्रीय मंत्री, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी यांच्यासह १०० हून अधिक संस्था आणि ४०० वक्ते सहभागी होणार आहेत. शहरी लवचिकता, अन्न व्यवस्था आणि ऊर्जा संक्रमण या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. नोंदणीद्वारे सर्व हवामानप्रेमींसाठी प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे.

हब-अँड-स्पोक मॉडेल –

मुंबई क्लायमेट वीक ‘हब-अँड-स्पोक’ पद्धतीने आयोजित केला आहे. मध्यवर्ती हबमध्ये नेतृत्व संवाद, विषयानुरूप सत्रे, एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज, यूथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज, ‘वातावरण’ या नागरिक व्यासपीठासह उपाययोजना प्रदर्शन भरवले जाणार आहे. या आठवड्यात शहरभर शाश्वत मेळावे, सार्वजनिक व्याख्याने, चित्रपट प्रदर्शन, कला-सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिक कार्यशाळा आयोजित केल्या जातील.

राष्ट्रीय व जागतिक नेतृत्वाची उपस्थिती –

केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह उद्योगविश्वातील नोवेल टाटा, व्ही विद्यानाथन, अमित चंद्रा, अंकूर गुप्ता, जमशेद गोदरेज, नादिर गोदरेज, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे मार्टिन क्लायूस, सिंथिया मॅककॅफरे, अंजली रविकुमार, प्रतिक अग्रवाल, समीर शिसोदीया यांसारखे नेते हवामान कृतीतील भांडवली प्रवाह व धोरणांवर मत मांडणार आहेत. त्याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातून रोहिणी निलकेणी, मनोज कुमार, सत्यजित भातखळ, मृदुला रमेश, सीमा पौल, शिशिर सिन्हा आणि वीणा श्रीनिवासन यांचीही उपस्थिती राहणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातून पर्यावरणासाठी काम करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर सहभागी होणार आहेत.

नवोन्मेष, युवक नेतृत्व आणि नागरिक सहभाग –

नवोन्मेष हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज यांच्या भागीदारीत एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज आयोजित होणार असून स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि नागरी संस्थांना हवामान उपाय मांडण्याची संधी मिळेल. युनिसेफ इंडिया आणि युवाह यांच्या सहकार्याने युवकांसाठी कॅम्पस रोडशो आणि स्पर्धा होणार आहेत. 16 ते 24 वयोगटातील युवकांचे प्रकल्प धोरणकर्त्यांसमोर सादर केले जातील.

प्रदर्शन आणि समुदाय उपक्रम –

हबमध्ये भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात उद्योग, स्टार्टअप्स आणि स्वयंसेवी संस्था हवामान उपाय सादर करतील. गोदरेज ग्रुप, आयडीएफसी फर्स्ट बँक, महिंद्रा ग्रुप, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि मिरिक टेक यांसारख्या संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे. नागरिकांना प्रत्यक्ष प्रोटोटाइप व उपाय पाहण्याची संधी मिळणार आहे.

भारत आणि ग्लोबल साऊथसाठी नवा हवामान मंच –

मुंबई क्लायमेट वीक हा नागरिक सहभाग, सार्वजनिक-खासगी-लोक भागीदारी आणि शहरस्तरीय अंमलबजावणीवर आधारित भारतीय मॉडेल सादर करतो. हवामान कृतीत भारताच्या नेतृत्वाची दिशा दाखवणारा हा उपक्रम वार्षिक स्वरूपात पुढे नेण्याचा मानस आहे. तीनही विषयक स्तंभ आणि सत्रांची सविस्तर माहिती https://www.mumbaiclimateweek.com/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरणाची गंभीर दखल; लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsmumbai climate weekmumbai climate week 2026suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

June 18, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

June 18, 2026
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page