• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

BMC Mayor : मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर; रितू तावडेंनी स्वीकारला पदभार, अधिकृतपणे निवड झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 11, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
BMC Mayor : मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर; रितू तावडेंनी स्वीकारला पदभार, अधिकृतपणे निवड झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 11 फेब्रुवारी : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 7 फेब्रुवारी 2026 रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. भाजपकडून रितू तावडे तर शिवसेना (शिंदे गट) कडून संजय घाडी यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. विरोधकांनी उमेदवार न दिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणाही करण्यात आली.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती –

मुंबई महानगरपालिका भवन येथे आज नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, आमदार चित्रा वाघ, आमदार संजय उपाध्याय तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर-उपमहापौरांनी हाती घेतली धुरा –

भाजपच्या रितू तावडे यांनी मुंबईच्या महापौरपदाची सूत्रे स्वीकारली असून शिवसेना (शिंदे गट) चे संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. महापौरपदासाठी भाजपमध्ये रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावांची चर्चा होती; मात्र अंतिमतः तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

मुंबईत भाजपचा पहिला महापौर –

रितू तावडे या मुंबईतील भाजपच्या पहिल्या महिला महापौर ठरल्या आहेत. मागील 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपच्या त्या पहिल्याच महापौर झाल्या आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महापौरपदावर भाजपचा उमेदवार विराजमान होण्याचा मार्ग सुकर झाला होता.

सत्तारोहणाचा पहिलाच दिवस ठरला वादळी –

दरम्यान, पदग्रहण सोहळ्यानंतर सभागृहात भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये तीव्र वाद रंगला. बसण्यासाठी जागा न दिल्याचा आरोप करत काँग्रेस नगरसेवकांनी व्यासपीठासमोर ठिय्या आंदोलन केले. महापौरांचे भाषण सुरू असताना “जागा द्या” अशा घोषणा देण्यात आल्या. काही महिला नगरसेविका जमिनीवर बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. “महिला महापौर, महिलांचाच अपमान” असा आरोप करत काँग्रेसने सभागृहातून वॉकआऊट केला. त्यामुळे भाजपच्या सत्तारोहणाचा पहिलाच दिवस गदारोळात गेला.

कोण आहेत रितू तावडे? –

रितू तावडे या विद्याविहारच्या रहिवासी असून त्या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. 2012 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून त्यांनी पहिला विजय मिळवला. 2017 मध्ये घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 121 मधून त्या निवडून आल्या. 2025 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून त्यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

उपमहापौर संजय घाडी यांची पार्श्वभूमी –

शिवसेना (शिंदे गट) कडून उपमहापौरपदाची संधी संजय घाडी यांना मिळाली आहे. ते 2017 ते 2022 या कालावधीत शिवसेना नगरसेवक होते. सलग दुसऱ्यांदा ते निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नी संजना घाडी या शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या असून मुलगा सुयश युवासेना विधानसभा समन्वयक म्हणून कार्यरत आहे.

हेही वाचा : पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, बीडमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bmc mayormarathi newsmayorritu tawadesanjay ghadisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा परिषदेला राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये मानाचे स्थान; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यस्तरावर अव्वल

जळगाव जिल्हा परिषदेला राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये मानाचे स्थान; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यस्तरावर अव्वल

February 11, 2026
BMC Mayor : मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर; रितू तावडेंनी स्वीकारला पदभार, अधिकृतपणे निवड झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

BMC Mayor : मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर; रितू तावडेंनी स्वीकारला पदभार, अधिकृतपणे निवड झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

February 11, 2026
जळगाव जिल्हा पोलीस भरती: उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आवाहन

जळगाव जिल्हा पोलीस भरती: उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आवाहन

February 11, 2026
डीपीडीसी 2026-27 साठी जळगाव जिल्ह्याला किमान 300 कोटींचा वाढीव निधी द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

डीपीडीसी 2026-27 साठी जळगाव जिल्ह्याला किमान 300 कोटींचा वाढीव निधी द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

February 11, 2026
पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, बीडमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं?

पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, बीडमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं?

February 11, 2026
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून; ‘या’ दिवशी सादर होणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून; ‘या’ दिवशी सादर होणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

February 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page