मुंबई, 9 जुलै : मुंबईतील वरळीमध्ये भरधाव कारने कोळी दाम्पत्याला उडवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अखेर अटक करण्यात आली आहे. तब्बल 60 तासांनी मिहीरला अटक करण्यात आली आहे. मिहिर शहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी शहापूरमधून ताब्यात घेतले असून मिहीरला पळून जण्यात मदत करणाऱ्या 12 जणांनाही अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक –
वरळी हीट अँड रन प्रकरणात शिवसेना उपनेत्याच्या बड्या बापाच्या लेकाने त्याच्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या जोडप्याला उडवले. दारुच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून मिहीर शाह याने एका निष्पाप महिलेचा बळी घेतला. या घटनेनंतर तो फरार झाला होता. अखेर, तब्बल 60 तासांनी याप्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी शहापूर येथील एका फ्लॅटमधून अटक केली आहे. या अगोदर मिहीरचे वडील, आई आणि बहिणीसह या प्रकरणात शाह कुटुंबीयांना मदत करणाऱ्या 12 जणांना आत्तापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? –
वरळीत मिहीर शाह याने भरधाव कारने एका दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली होती. विशेष म्हणजे तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेच्या अंगावर गाडी चालवत तिला फरफटत नेले होते. यात त्या महिलेचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला. तर महिलेचे पती प्रदीप नाखवा हे जखमी झाले होते. दरम्यान, अपघातानंतर मिहीर शहा फरार होता. आज अखेर त्याला पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर पुन्हा हल्ला, 5 जवान शहीद