नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला काल 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या वतीने खान्देशातील आमदारांशी खान्देशातील प्रश्नांवर, विधानसभा मतदारसंघातील विकासकामांवर संवाद साधला जात आहे. यामध्ये ‘सुवर्ण खान्दश लाईव्ह’ने चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणेंशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारसंघातील प्रश्न, आगामी काळातील विकासकामे यावर भाष्य केले.