बोदवड, 9 ऑगस्ट : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा वर्ष 2023-24 निमित्त बोदवड पंचायत समितीच्या शिक्षण विभाग अंतर्गत नडगाव येथील आश्रमशाळेस खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा तालुकास्तरावर तृतीय क्रमांक मिळालाय. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील ही एकमेव आश्रम शाळा ठरलीय.
बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील वि.ज.भ.ज.प्राथमिक आश्रम शाळेस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत रु. 1,00,000/- रूपये पुरस्कार व समान चिन्ह मिळाला आहे. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक अशोक बोरसे, शाळेचे शिक्षकवर्ग संजय वाघ, प्रकाश मराठे, साहिल खाटीक, विलास पाटील, मंगल कोळी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमात बोदवड गट शिक्षक अधिकारी बी.एन.लहासे, मुख्य अधिकारी नगरपंचायत बोदवड गजानन तायडे, गट विकास अधिकारी पंचायत समिती बोदवड श्रीमती निशा जाधव, तसेच बोदवड तालुका केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील सर यांची उपस्थिती होती.
हेही वाचा : चोपडा-अमळनेर रोडवर बनावट दारूसाठ्याची वाहतूक, राज्य उत्पादन शुल्काची कारवाई, लाखांचा मुद्देमाल जप्त