• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लेवा पाटीदार समाजाच्या इतिहासात सुवर्णक्षण; ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत ऐतिहासिक झेप

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 21, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 21 मार्च: जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण लेवा पाटीदार समाजासाठी कु. नंदिनी संजीव पाटील यांचे UPSC मधील यश अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे समाजाचे नाव देशपातळीवर उज्ज्वल झाले असून, ही कामगिरी तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, लेवा पाटीदार समाज हा कष्टाळूपणा, शिक्षणनिष्ठा व प्रगतीशील विचारसरणीसाठी ओळखला जातो. कु. नंदिनी पाटील यांनी या परंपरेला नवी उंची देत समाजाचे सामर्थ्य अधोरेखित केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी मोठी स्वप्ने पाहून जिद्द, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करत त्यांनी नंदिनी पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) प्रतिष्ठित परीक्षेत कु. नंदिनी संजीव पाटील यांनी ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले असून, त्या लेवा पाटीदार समाजातून UPSC उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्याच मुलगी ठरल्या आहेत. त्यामुळे हा क्षण समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. त्यांचे वडील संजीव देविदास पाटील व आई सौ. शिल्पा संजीव पाटील हे जळगाव येथे खाजगी क्लासेसच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करतात.
दरम्यान, या यशाबद्दल जळगाव येथे कु. नंदिनी पाटील यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यांची होती विशेष उपस्थिती –
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेवक पियुष कोल्हे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, प्रवीण कोल्हे, उद्योजक किशोर डालू ढाके, भरत धर्मा खडके, ज्ञानेश्वर गोपाळ भोळे, तुषार महाजन, स्वीय सहाय्यक हेमंत नारखेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कु. नंदिनी पाटील यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

हेही वाचा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: guardian minister gulabrao patiljalgaon newsnandini sanjeev patilsuvarna khandesh liveupsc success

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईचे राज्यपाल राजा महाराज सिंह (डावीकडून) आणि क्रिकेटपटू आणि राज्यपालांचे एडीसी रुसी मोदी (उजवीकडून)

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 20 | तब्बल 76 वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम

March 21, 2026
VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

March 21, 2026
नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 21, 2026
सातगाव डोंगरी येथे श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ; आज कथेचा दुसरा दिवस

सातगाव डोंगरी येथे श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ; आज कथेचा दुसरा दिवस

March 21, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Big Breaking! रूपाली चाकणकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Big Breaking! रूपाली चाकणकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

March 20, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page