• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 20 | तब्बल 76 वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 21, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, साहित्य-परंपरा
मुंबईचे राज्यपाल राजा महाराज सिंह (डावीकडून) आणि क्रिकेटपटू आणि राज्यपालांचे एडीसी रुसी मोदी (उजवीकडून)

मुंबईचे राज्यपाल राजा महाराज सिंह (डावीकडून) आणि क्रिकेटपटू आणि राज्यपालांचे एडीसी रुसी मोदी (उजवीकडून)

मुंबई, 21 मार्च: महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘किस्से लोकभवनाचे’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. दरम्यान, किस्से लोकभवनाचे या मालिकेचा हा 20 वा लेख आहे.

मुंबईच्या एका राज्यपालांच्या नावे सहज घडलेला क्रिकेट मधील एक जागतिक विक्रम गेल्या ७६ वर्षांमध्ये कुणीही मोडू शकलेला नाही. हे विक्रमवीर गव्हर्नर होते स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे पहिले भारतीय गव्हर्नर राजा महाराज सिंह.

सर्वसाधारणपणे गव्हर्नर किंवा राज्यपालांना महत्वाच्या सामन्यांच्या वेळी निमंत्रित केले जाते ते नाणेफेकीसाठी, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी किंवा सामना संपल्यानंतर चषक/बक्षीस वितरणासाठी. परंतु, मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या तीन दिवसांच्या प्रथमश्रेणी सामन्यात गव्हर्नर राजा महाराज सिंह खेळाडू व कर्णधार म्हणून प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

राज्यपालांचे एडीसी असलेले रुसी मोदी हे स्वतः क्रिकेटर होते व ते स्वतः देखील या संघाकडून खेळत होते. दिनांक २५ – २७ नोव्हेंबर १९५० असे तीन दिवस खेळल्या गेलेला हा प्रथम श्रेणी सामना होता बॉम्बे गव्हर्नर्स XI विरुद्ध कॉमनवेल्थ XI.

संघाचे नाव बॉम्बे गव्हर्नर्स XI असल्यामुळे राजा महाराज सिंह यांना संघाचे कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. या संघामध्ये भारतातल्या नवानगर व पतियाळा अश्या दोन राजघराण्यांचे सदस्य देखील खेळाडू म्हणून सहभागी झाले होते. राजा महाराज सिंह स्वतः पतियाळा राजघराण्याचे होते.

बॉम्बे गव्हर्नर संघाचे सदस्य होते: एम आर रेगे, एम एस रणवीर सिंहजी (नवानगर), रुसी मोदी (गव्हर्नर साहेबांचे एडीसी होते), चंद्रकांत गडकरी, पतियाळाचे युवराज, के राज सिंह, ए के खन्ना, व्ही राजिंदर नाथ (यष्टीरक्षक), राजा महाराज सिंह (कर्णधार), सी आर रंगाचारी व गुलाम अहमद.

कॉमनवेल्थ संघाचे कर्णधार होते लेझली एम्स व सदस्य होते लेन फिशलॉक, जॉर्ज एम्मेट, जॅक इकिन, केन ग्रिव्ज, रेजिनाल्ड स्पूनर (यष्टीरक्षक), डिक शॅकलटन, एड्डी पेंटर, जिम लेकर, जॉर्ज ट्राइब, लेझली एम्स (कर्णधार ) व सोनी रामदिन. या सामन्यात बॉम्बे गव्हर्नर XI संघ पराभूत झाला तर कॉमनवेल्थ संघ विजयी झाला. पण ते महत्वाचे नाही!

राज्यपालांचे एडीसी रुसी मोदी यांनी पहिल्या डावात संघाच्या वतीने सर्वाधिक ६८ धावा केल्या. राजा महाराज सिंह यांचा हा पहिलाच प्रथम श्रेणी क्रिकेट सामना होता आणि त्यात त्यांनी नवव्या क्रमांकावर खेळण्यासाठी येऊन ४ धावा काढल्या…मोठी गोष्ट आहे.राज्यपाल आपल्या एडीसीसह एकत्र खेळले असा हा कदाचित पहिलाच प्रथम श्रेणीचा सामना असेल!

योगायोग म्हणजे दोघांनाही इंग्लंडचा फिरकीपटू जिम लेकरने बाद केले. गोलंदाज जिम लेकर हा राजा महाराज सिंह यांच्या पेक्षा तब्बल ४४ वर्षांनी लहान होता. आपला पहिला वहिला प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळणारे मुंबईचे राज्यपाल राजा महाराज सिंह यांचे नाव रेकॉर्ड बुक मध्ये गेले ते यासाठी की दिनांक २५ नोव्हेंबर १९५० या सामन्याच्या पहिल्या दिवशी त्यांचे वय होते ७२ वर्षे १९२ दिवस. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी राज्यपाल ब्रेबॉर्न स्टेडियमकडे फिरकलेही नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात त्यांच्या नावापुढे अनुपस्थित असे लिहिण्यात आले.

लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, लोकभवन, मुंबई)

हेही वाचा: किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 19 | आईच्या आठवणीने भावूक झाली ब्रिटिश गव्हर्नरची नात!

बातमी शेअर करा !
Share
Tags: governor cricket recordkisse lokbwanachemarathi newsspecial seriessuvarna khandesh liveumesh kashikar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page