नवी दिल्ली, 10 जून : नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांचा काल मोठ्या दिमाखात शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. पीएम किसान योजनेच्या 27 व्या हफ्त्याच्या फाईलवर पंतप्रधान मोदी यांनी स्वाक्षरी केली.
काय आहे संपुर्ण बातमी? –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पंतप्रधान कार्यालयात येत पंतप्रधान पदाचा कारभार स्विकारला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी असलेली योजना पीएम किसानच्या 17 व्या हफ्त्याच्या फाईलवर पंतप्रधान मोदी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये जमा होणार आहेत. दरम्यान, केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी हा पहिला निर्णय घेतला आहे.
पीएम किसान योजनेचा मिळणार 17 वा हप्ता –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या 27 व्या हफ्त्याच्या फाईलवर सही केल्याने देशातील तब्बल 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये 17 व्या हप्त्यामध्ये सुमारे 20 हजार कोटी कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आली आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 2 हजार रुपयांचा हा हप्ता कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे पीएम किसान योजना? –
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभधारक शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये दिले जातात. यामध्ये एका वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही योजना 24 फेब्रुवारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आली होती आणि अद्याप ही योजना सुरु आहे. तसेच आता एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय हा पीएम किसान योजनेसंदर्भात घेत शेतकऱ्यांना 17 वा हप्ता मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, आत्तापर्यंत पीएम-किसानचे 16 हप्ते शेतकऱ्यांना जारी करण्यात आले आहेत.
हेही वाचा : “जोपर्यंत मी माझी भूमिका स्पष्ठ करत नाही तोपर्यंत कुणालाच….” सामनाच्या अग्रलेखावर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया