• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 21, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा, व्हिडीओ
VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

पाचोरा, 21 मार्च: पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रातील शिक्षण क्षेत्राला नवी उभारी देत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक पाऊल म्हणून उद्या, रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी भव्य ‘ज्ञानोत्सव’ (Knowledge Festival 2026) आयोजित करण्यात आला आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नर्मदा इंटरनॅशनल स्कूलतर्फे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, भडगाव रोडवरील अंतुर्ली फाट्याजवळ सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम संपन्न होणार आहे. या ज्ञानोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या विविध संधींची ओळख करून देत त्यांना प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

पाचोऱ्यात ज्ञानोत्सवाचे आयोजन –

नर्मदा इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘ज्ञानोत्सव’ कार्यक्रमास मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष भाईजी राध्येशामजी चांडक राहणार असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त मुंबई येथील संजय पाटील उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या रविवार, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य ‘ज्ञानोत्सव’ संपन्न होणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी रुचकर भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय –

पाचोरा-भडगाव परिसरात गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षणासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या दूरदृष्टीतून नर्मदा इंटरनॅशनल स्कूलची पाचोरा शहरात दि. ११ जूनपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर, शाळेत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सोयी-सुविधांची सविस्तर माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नर्मदा इंटरनॅशनल स्कूलतर्फे भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.

दरम्यान, या ज्ञानोत्सवाला शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील तसेच नर्मदा इंटरनॅशनल स्कूल परिवारातर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत नवी पिढी घडविण्यासाठी हा उपक्रम एक प्रभावी चळवळ ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: knowledge festivalknowledge festival pachoramla kishor appa patilnarmada international schoolpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निसर्गाधारित जीवनशैलीची ओळख करून देणाऱ्या ‘ग्रीन निच 2.0’ कार्यशाळेचे साखळीत आयोजन

निसर्गाधारित जीवनशैलीची ओळख करून देणाऱ्या ‘ग्रीन निच 2.0’ कार्यशाळेचे साखळीत आयोजन

March 21, 2026
मुंबईचे राज्यपाल राजा महाराज सिंह (डावीकडून) आणि क्रिकेटपटू आणि राज्यपालांचे एडीसी रुसी मोदी (उजवीकडून)

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 20 | तब्बल 76 वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम

March 21, 2026
VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

March 21, 2026
नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 21, 2026
सातगाव डोंगरी येथे श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ; आज कथेचा दुसरा दिवस

सातगाव डोंगरी येथे श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ; आज कथेचा दुसरा दिवस

March 21, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page