• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील ‘या’ चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 4, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील ‘या’ चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव

नवी दिल्ली, 4 जून: शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील पंचायतींमध्ये महाराष्ट्राने आपली ठळक छाप उमटवत राष्ट्रीय स्तरावर मोठे यश संपादन केले आहे. ‘बालस्नेही पंचायत’ आणि ‘जलसमृद्ध पंचायत’ या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आज राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५’ चा दिमाखदार वितरण सोहळा आज नवी दिल्ली येथे पार पडला. केंद्रीय पंचायती राज मंत्री श्री. राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह, केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल तसेच आसाम सरकारचे मंत्री श्री. रामेश्वर तेली यांच्या हस्ते विविध श्रेणींतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या नऊ प्रमुख विषयांवर आधारित कार्याचे मूल्यमापन करून पंचायतींना गौरविण्यात आले. पंचायत प्रगती निर्देशांक च्या आधारे देशभरातील एकूण ४२ उत्कृष्ट पंचायतींची निवड करण्यात आली. यापूर्वी, २४ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन विशेष श्रेणींतील पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. आजच्या समारंभात उर्वरित श्रेणींतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार’ अंतर्गत ३४ ग्रामपंचायतींना, तर ‘नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार’ अंतर्गत ८ पंचायतींना गौरविण्यात आले.

महाराष्ट्रातील चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव –

भंडारा जिल्ह्यातील इटगाव (पु.) ग्रामपंचायतीने ‘बालस्नेही पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत १ कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.

तसेच, रायगड जिल्ह्यातील खारीवली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने ‘जलसमृद्ध पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत १ कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतीला हा सन्मान मिळाला.

नाशिक जिल्ह्यातील निंबळे (ता. चांदवड) ग्रामपंचायतीने सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत ७५ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. तसेच, रायगड जिल्ह्यातील चांभारली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने ‘सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा’ या श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळवत ३७.५ लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला.

या प्रसंगी पुरस्कारप्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्याचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या विशेष ई-पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. तसेच देशभरातील पंचायती राज संस्थांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘बेस्ट प्रॅक्टिसेस कॉम्पेंडियम’ चे प्रकाशन करण्यात आले. काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. विशेष सत्रांमध्ये पुरस्कारप्राप्त पंचायतींच्या प्रतिनिधींनी आपल्या यशस्वी उपक्रमांचे आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींचे सादरीकरण केले.

कार्यक्रमास पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, अवर सचिव सुशील कुमार लोहानी, भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच देशभरातील पंचायत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अन्न व प्रशासन विभागात कारवाईचा धडाका; पान मसाला, गुटखा व भेसळयुक्त अन्नपदार्थांचा ₹1.58 कोटींचा साठा जप्त

बातमी शेअर करा !
Share
Tags: Gram Panchayatmarathi newsnational panchayat awardsNew Delhipanchayatraj ministrysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

October 23, 2026
एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

October 23, 2026
500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 22, 2026
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

October 22, 2026
बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

October 22, 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

October 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page