नंदुरबार, 25 फेब्रुवारी : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विनाअनुदानित शिक्षणशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा. आणि शिक्षक कर्मचारी असोसिएशन कल्याण जिल्हा ठाणे या संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. संजय अहिरे यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. संजय अहिरे हे नवापूर येथील शिक्षणशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मेघा गुळवणी, डॉ. विद्युल्लता कोल्हे, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. सचिन इंगळे, डॉ.खुपासे यांनी सर्वानुमते ही निवड केली.
दरम्यान, डॉ. संजय अहिरे यांची उत्तर महाराष्ट्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री सुरुपसिंग नाईक, कार्याध्यक्ष, आमदार शिरीषकुमार नाईक, सचिव तानाजीराव वळवी,कोशाध्यक्ष आरिफभाई बलेसरिया यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.