मुंबई, 11 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. असे असताना आज अजित पवार हे अमळनेर तसेच जामनेर येथील कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. दरम्यान, आज संध्याकाळी त्यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महायुतीत कुठलीही धूसफूस नाही..त्यापद्धतीचे कुठलेही चित्र नाही. सर्व काही All Is Well आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या चर्चांवर पडदा टाकलाय.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले? –
महायुती सरकारच्या काल पार पडलेली मंत्रीमंडळाची सुरू असताना अजित पवार हे बाहेर पडल्याची माहिती समोर आली होती. यावरून महायुतीत सगळकाही आलबेल नसल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर अजित पवार म्हणाले की, महायुतीत सर्व काही सुरळीत सुरू आहे तसेच कुठलीही धूसफूस नाही..त्यापद्धतीचे कुठलेही चित्र नाही. तसेच आमच्या पक्षातील नेत्यांना जे योग्य वाटतं ते त्यांना मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, पक्षाच्या संदर्भातील प्रवक्ता म्हणून जी भूमिका मांडली जाईल, त्यासोबत आम्ही सर्व सहमत असू असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. दरम्यान, महायुतीत जागावाटपाची घोषणाही लवकरच होईल असेही अजित पवार म्हणाले.
सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश –
अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. यावेळी गेले काही वर्ष अभिनयात काम केलं. यानंतर पर्यावरणासाठी काम करताना राजकारणात यावसं वाटलं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मला विश्वास वाटला आणि मी त्या पक्षात प्रवेश करत असल्याचे सयाजी शिंदे यांनी यावेळी स्पष्ठ केले. तसेच चांगल काम करायचे आहे. त्यामुळे मी प्रवेश करत आहे आणि पुढच्या पाच वर्षात चांगलं काम करणार आहे, असेही सयाजी शिंदे यांनी सांगितले.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. विजयश्री मुठे यांची विशेष मुलाखत