जळगाव, 16 ऑगस्ट : राज्याची विधानसभा निवडणूक ही पुढील दोन-तीन महिन्यांवर आली असताना जळगाव जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे. जळगाव जिल्ह्यात या आठवड्याच्या सुरूवातीला राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा दौरा झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. जळगाव ग्रामीणसह पारोळा आणि अमळनेर येथे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यांमध्ये संवाद साधणार आहेत.
सुप्रिया सुळे याठिकाणी साधणार संवाद –
खासदार सुप्रिया सुळे यांचे उद्या पहाटे जळगावात आगमन होणार असून सकाळी 9 वाजता ते शहरातील छत्रपती संभाजी नाट्यगृहात महिला मेळाव्यात संवाद साधणार आहेत. यानंतर त्या पारोळा येथे भेट देणार असून पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. दरम्यान, दुपारी 4 वाजता अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत.
महायुती विरूद्ध महाविकास आघाडी –
जळगाव जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ असून 10 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. यामध्ये शिवसेना (शिंदे गट 5), भाजप (4), राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट 1) आणि काँग्रेस (1) असा समावेश आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील महायुतीची ताकद पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मोठे आव्हान उभे केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात जळगाव जिल्ह्याचे राजकीय वातावरण आणखी तापण्याची देखील शक्यता आहे.
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत