• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 23, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

मुंबई, 22 ऑक्टोबर: एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. प्रवाशांना स्वच्छ, निरोगी आणि आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची मूलभूत जबाबदारी असून, स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले.

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते.

स्वच्छता अधिभाराच्या बदल्यात दर्जेदार सुविधा द्या –

एसटी महामंडळ प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारते. या अधिभाराच्या बदल्यात प्रवाशांना स्वच्छतेच्या किमान सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्यामुळे बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवणे आणि प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छतेच्या कामात कोणत्याही प्रकारची कुचराई होता कामा नये. प्रवाशांच्या रास्त अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक दक्षतेने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करा –

बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी, स्वच्छतेच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवावे आणि संबंधित कंत्राटदार संस्थांकडून करारातील अटींनुसार स्वच्छता करून घ्यावी, असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले. स्वच्छतेची जबाबदारी केवळ कंत्राटदारांवर सोपवून चालणार नाही. आपल्या कार्यक्षेत्रातील बसस्थानकांवर नियमित स्वच्छता राखली जात आहे की नाही, याची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः करणे आवश्यक आहे. प्रवाशांना स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

एसटी ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबतच स्वच्छ बसस्थानके व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देण्यास महामंडळाने प्राधान्य द्यावे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले.

हेही वाचा: एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

बातमी शेअर करा !
Share
Tags: cleanlinessmarathi newsminister pratap sarnaikMSRTCST bus stationssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

October 23, 2026
एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

October 23, 2026
500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 22, 2026
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

October 22, 2026
बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

October 22, 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

October 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page