• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

मोठी बातमी! नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, कारणही सांगितलं…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 28, 2024
in देश-विदेश
मोठी बातमी! नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, कारणही सांगितलं…

नितीश कुमार यांनी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

पाटणा, 28 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा होती. अखेर यातच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडी या पक्षासोबतची आघाडी मोडत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे केली. नितीश कुमार यांनी राजभवनामध्ये राज्यपालांची भेट घेऊन आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला.

राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार काय म्हणाले?

नितीश कुमार हे आरजेडी पक्षाशी काडीमोड करुन भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्यात अशा चर्चा आहेत. यातच त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून आरजेडी पक्षासोबत आघाडी मोडली आहे. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला याबाबत खुलासा केला आहे.

आज मी राजीनामा दिला आहे. आरजेडीच्या व्यवहारांना तेथील जनता कंटाळली होती. राज्यातील जनता आनंदी नव्हती. पक्ष आणि जनमत लक्षात घेऊन मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असे नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल काय म्हणाले?

तर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी नितीश कुमार यांचा राजीनामा स्वीकारला आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना हंगामी मुख्यमंत्री म्हणून कार्य करण्यास सांगितले.

असे आहे बिहार विधानसभेचे पक्षीय बलाबल –

दरम्यान, बिहार विधानसभेत जेडीयूकडे 45 आमदार आहेत. तर भाजपकडे 76 आणि जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाकडे 4 आमदार आहेत. अशा स्थितीत तिन्ही पक्षांकडे मिळून 125 आमदार होतात आणि बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 122 आमदारांची आवश्यकता आहे. असे असताना बहुमतापेक्षा तीन आमदार अधिक एनडीएकडे असतील.

दुसरीकडे नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. नितीश कुमार यांना यावेळी पलटी मारणं महागात पडेल असे ते म्हणाले. जदयू प्रमुख नितीश कुमार यांच्या बैठका सुरू असताना आरजेडी प्रमुख लालु प्रसाद यादव यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काळात आणखी काय काय घडामोडी घडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: nitish kumarnitish kumar latest newsnitish kumar newsnitish kumar resigns

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

नीट पेपरफुटी प्रकरण; लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

May 18, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘जनजातीय गरिमा उत्सव २०२६’ व ‘जन भागीदारी अभियान’चा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात ‘जनजातीय गरिमा उत्सव २०२६’ व ‘जन भागीदारी अभियान’चा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

May 18, 2026
नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

May 18, 2026
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

May 18, 2026
भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

May 18, 2026
एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

May 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page