चौगाव (धुळे), 19 सप्टेंबर : समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय मोराणे धुळे अंतर्गत धुळे तालुक्यातील चौगाव येथे “इतरांचा आदर आणि महिलांचा सन्मान” या विषयावर काल 18 सप्टेंबर रोजी एक दिवशीय विशेष जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे समाजातील महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार यांच्यावर आळा घालावा तसेच प्रगतीच्या मार्गावर जाणारी स्त्रीचा अपमान नव्हे तर सन्मान होणे काळाची गरज आहे की लोकांमध्ये समज आणून देणे व महिलांना त्यांच्या कामाप्रती योग्य तो सन्मान देऊन त्यांना त्यांच्या कामांमध्ये प्रोत्साहन म्हणजे त्यांच्या कामाप्रती सन्मान होईल हे लक्षात आणून देणे, महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच समाजाचा मुख्य व वरिष्ठ घटक म्हणजे वृद्ध या व्यक्तींचा आदर केला पाहिजे. त्यांच्या अनुभवातून आपण पुढील जीवन योग्य त्या मार्गदर्शनाने योग्यरीत्या चालविले पाहिजे.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत
या कार्यक्रमात प्रथमता कै. वेडू नारायण पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक चौगाव येथील विद्यार्थ्यांसोबत मिळून चौगाव गावात रॅली काढण्यात आली. त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. त्यादरम्यान चौकामध्ये प्रशिक्षणार्थींनी पथनाट्याचे प्रदर्शन केले व सामाजिक गीत देखील म्हणण्यात आले. व त्यानंतर विठ्ठल मंदिर सभागृह चौगाव येथे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथमता पोस्टर प्रदर्शन करण्यात आले त्यामध्ये इतरांचा आदर व महिलांचा सन्मान व शिव्या मुक्त समाज यावर प्रशिक्षणार्थींनी ज्वलंत असे चित्रे व वाक्य लिहून आपली मतं मांडली होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम शिंदे (उपसरपंच चौगाव) कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विजय सैंदाणे (ग्रामविकास अधिकारी चौगाव )कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.फरिदा खान (डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे धुळे ) कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा.डॉ.दिलीप घोंगडे ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय मोराणे) व तसेच कार्यक्रमाला उपस्थित गावातील ज्येष्ठ नागरिक ,प्रतिष्ठित व्यक्ती ,ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका ,आरोग्य सेवक, आशा सेविका, सीआरपी (माविम) बचत गट अध्यक्ष, पोस्ट मास्टर्स ,युवक मंडळ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले व तसेच प्रमुख वक्ते यांनी महिलांविषयी होणाऱ्या अन्याय व अत्याचार तसेच त्यांची प्रगती यातील योग्य तो फरक समजावून सांगितला.
कार्यक्रमाचे आयोजन समाजकार्य महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी गौरव नाईक, योगिता पवार, अर्चना सूर्यवंशी, जयश्री पाटील, नेहा धिवरे, नरेद्र पाडवी, प्रतीक्षा वाघ, योगेश पाटील, आकाश गांगुर्डे, दिपाली पालवी, वर्षा गायकवाड, कविता मोरे, प्रतिभा गायकवाड, सलोनी बैसाणे, पदमर वर्षा, पावरा प्रगती, वसावे रवींद्र, तेजस्विनी धनगर, कोमल शिंदे, दुर्गेश मांडलि, देवेंद्र पवार, देवयानी पाटील, रुपाली राऊत, गावित सुंदर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे). कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पवार यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्ताविका गौरव नाईक यांनी मांडली व तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आकाश गांगुर्डे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.