पुणे, 7 जानेवारी : राज्यात अलीकडेच तलाठी भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती. दरम्यान, तलाठी भरती परीक्षेचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. एका विद्यार्थ्याला 200 पैकी 214 गुण मिळाले असून त्यामुळे विद्यार्थ्यांकडून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा –
राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठी भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आजपर्यंतच्या शैक्षणिक इतिहासातील हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. “तलाठी भरती परीक्षा” हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी ट्विट करत केली आहे.
विजय वडेट्टीवारांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय? –
विजय वडेट्टीवारांनी ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे, “तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत आहे.
मागणी, आणि ती पण SIT चौकशीची..? आतापर्यंत या सरकारने जितक्या SIT स्थापन केल्या, त्याचे निकाल काय आले ? हे माहीत असूनही, तुमचा इतका मिळमिळीत विरोध का ? एक लिमिट मध्ये राहून विरोध करायच्या म्हणजे विरोध पण दिसेल आणि ED पण येणार नाही. असं काही आहे का ?”, असं विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा : पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण, ‘त्या’ भाजप आमदारांविरोधात गुन्हा दाखल