पाचोरा, 22 फेब्रुवारी : जळगाव ते चाळीसगाव या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाल्याने हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात यावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
काल मंगळवारी 21 फेब्रुवारीला रोजी महाविकास आघाडीतर्फे एकाचवेळी साखळी पद्धतीने तालुक्यातील नांद्रा, पाचोरा येथील जारगाव चौफुली, भडगाव, नगरदेवळा आणि कजगाव येथेही अर्धा तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रस्ता रोको आंदोलना प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.
दरम्यान, या रस्ता रोको आंदोलनाप्रसंगी जारगाव चौफुली येथे माजी आमदार दिलीप वाघ, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, भुषण वाघ, बशीर बागवान, अशोक मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, खलील देशमुख, शहर अध्यक्ष अजहर खान, शालिग्राम मालकर, महिला आघाडीच्या ज्योती वाघ, सुलोचना वाघ, सरला पाटील, रेखा देवरे, जयश्री मिस्तरी, पी. डी. भोसले, रणजीत पाटील, सुदर्शन महाजन, हरुण देशमुख, तारीक अहमद, सैय्यद रज्जु बागवान, अॅड. अविनाश सुतार, सुदाम वाघ, बाबाजी ठाकरे, गोकुळ पाटील, वाजीद बागवान, गोपी पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, यांची उपस्थिती होती.
पाचोरा तालुक्यातील नांद्रा, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा व कजगाव याठिकाणी एकाचवेळी साखळी पद्धतीने सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलनात करण्यात आले. जारगाव चौफुली येथे करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, नॅशनल हायवेचे उपविभागीय अभियंता विजय वाघ, शाखा अभियंता पोतदार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी 5 मार्चपर्यंत रस्त्याच्या कामांची निविदा काढण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन दिल्यानंतर हे रस्ता रोको आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे पाचोरा ते भडगाव रस्त्यावरील दोन्ही बाजुच्या रहदारीस खोळंबा झाला होता.
आंदोलनादरम्यान यांचीही होती उपस्थिती –
मा. सभापती शेख इस्माईल शेख फकिरा, इरफान मणियार, अमजद मौलाना, अध्यक्ष राहुल शिंदे, श्रावण गायकवाड, चंद्रकांत महाजन, इस्माईल तांबोळी, फईम शेख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, शहर प्रमुख अनिल सावंत, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश बाफना, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, दत्ता जडे, पप्पु राजपुत, जितेंद्र जैन, समता सैनिक दलाचे जिल्हा समन्वयक किशोर डोंगरे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे मुकेश तुपे, क्षत्रिय गृपचे कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.