ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा : अनेक शिक्षण संस्थाचालक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. निवडणुकीत ते कामाला लागले आहे. या शिक्षण संस्था चालकांकडून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या बेरोजगार उमेदवारांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे या उमेदवारांनी सावध राहावे, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले. पाचोरा येथील शिवालय या त्यांच्या संपर्क कार्यालयात काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते काय म्हणाले, पाहा हा व्हिडिओ.