ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 4 फेब्रुवारी : मैदानावर धावत असताना प्रौढाचा कोसळून जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पाचोऱ्यातील एसएसएमएम विद्यालयाच्या मैदानावर 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून वैभव शिवाजी पाटील (वय – 45 रा. गाडगेनगर, पाचोरा) असे मृत प्रौढाचे नाव असून याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकी बातमी काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव शिवाजी पाटील हे नेहमीप्रमाणे पाचोऱ्यातील एसएसएमएम विद्यालयाच्या मैदानावर व्यायाम म्हणून फिरण्यासाठी गेले होते. यावेळी धावत असताना वैभव पाटील जमीनीवर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच त्यांच्या नाकातून व कानातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.वैभव पाटील यांना ग्रामीण रूग्णालयात तपासणीसाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांना मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, 1 मुलगी आणि 2 बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, वैभव पाटील यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाला.हेही वाचा : Video : विश्वविजेत्या भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळेचा तरुणाईला काय सल्ला?