• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 17, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

पाचोरा, 17 एप्रिल: पाचोरा पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या तीन तासांत दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या माहितीनुसार, नय्युम जहांगिर देशमुख (रा. आक्सानगर, जारगाव, ता. पाचोरा) यांच्या इलेक्ट्रिक दुकानाच्या गोडाऊनमधून सुमारे 94 हजार 500 रुपये किंमतीचे ‘गोदरेज’ कंपनीचे तीन एसी अज्ञात चोरट्यांनी 1 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान चोरून नेले होते. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘….अन् पोलिसांनी आरोपीला केली अटक’ –

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व गुन्हे शोध पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रिहान हमीश शहा (वय 22, रा. हनुमाननगर, पाचोरा) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले तीन एसी जप्त करण्यात आले.

मुद्देमाल हस्तगत –

याचबरोबर, 15 एप्रिल रोजी दाखल झालेल्या सोन्याची पोत चोरी (30 हजार रुपये किंमत) या प्रकरणाचाही उलगडा करत पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांतील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संबंधित फिर्यादींसह परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत आभार मानले आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत झाली आहे.

यांनी केली कारवाई –

जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार विलास पाटील, पोहेकॉ. वसीम शेख, पोहेकॉ. श्रीकांत गायकवाड, पोकॉ. योगेश पाटील, पोकॉ. संदीप राजपूत, पोकॉ. गणेश कुंवर यांनी ही कारवाई केली.

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटीलउन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: accused arrestedpachora police stationpachora taluka newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

July 20, 2026
मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

July 20, 2026
‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

July 19, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

July 19, 2026
पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page