ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 3 जून : लोकसभा निवडणुकीचा उद्या, 6 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यावतीने नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे.
पाचोरा पोलिसांनी केले महत्वाचे आवाहन –
पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, लोकसभा निवडणूक 2024 जाहीर झाल्यापासून ते 6 जूनपर्यंत आदर्श आचारसंहित लागू आहे. तसेच 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअपग्रुप व इतर एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकारवरील माध्यमांद्वारे करू नयेत.
तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये. डीजे वाजवणार नाहीत. फटाके फोडणार नाहीत. तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हाट्सअपग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक 3/6/2024 ते दिनांक 6/6/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये Only admin करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत. जर एडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह सर्व ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून त्यांचेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पाचोरा पोलिसांनी केलेल्या आवाहनात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : खान्देशात कोण मारणार बाजी? वाचा, ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’चा लोकसभा निवडणूक निकाल स्पेशल रिपोर्ट