• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात शिवसेना-भाजपचं बिनसलं, आमदारांवर टीका, बाजार समितीची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 13, 2023
in पाचोरा
पाचोऱ्यात शिवसेना-भाजपचं बिनसलं, आमदारांवर टीका, बाजार समितीची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार

पाचोरा, 13 एप्रिल : येत्या 28 एप्रिल रोजी पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे. राज्यात शिवेसना (शिंदे गट) आणि भाजप यांची युती असून हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. मात्र, पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्णपणे स्वबळावर लढवणार आहे. भाजपच्या वतीने या निवडणुकीसाठी बहुसंख्य उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत. तसेच या निवडणुकीत भाजपसोबत काही समविचारी उमेदवार निवडणूक लढणार आहे, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.

ही निवडणूक भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती सतीष शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी आपला स्वतंत्र संपर्क सुरू केला आहे, असे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

आपण ही निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. तरी आमदारांनी केलेल्या कुठल्याही प्रकारच्या अफवांना मतदारांनी व कार्यकर्त्यांनी बळी पडु नये. तसेच भाजपा पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते एकसंघ असुन या निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागले आहे, असे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आमदारांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आमदार दुसऱ्या पक्षांचे प्रवक्तेपद बळजबरीने उसने भाड्याने घेतल्यासारखे पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत. त्यांची स्वबळावर निवडणुका लढवण्याची ताकत पूर्णपणे खचली असल्याने आमदारांना व त्याच्या उर्वरित उमेदवारांना कुठलाही आत्मविश्वास उरलेला दिसत नाही.

ज्या आमदारांना पूर्वी भाजप हा पक्ष नकोसा होता, भाजपच्या नावाने आतापर्यंत ते आकांड तांडव करत होते. भाजप कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने त्रास देत होते, त्यांना आज अचानक भाजपची गरज का पडतेय? त्यांना भाजपची आठवण येण्याची उपरती का झाली? असा प्रश्न भाजप भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात उपस्थित केला आहे.

येत्या 20 तारखेला माघारीनंतर भाजप आणि समविचारी उमेदवारांच्या प्रचारांत भाजपचे पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन काम करतील, असे शहराध्यक्ष रमेश वाणी यांनी म्हटले. तसेच आमदारांनी मेळाव्यात व पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना योग्य त्या ठिकाणी पुराव्या निशी उत्तर देऊन त्यांचा खरा चेहरा मतदारांसमोर उघडा करू, असेही तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सदर पत्रकात म्हटले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjp pachorapachora market committeepachora newspachora politics

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page