• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

इंजिनिअर ते IAS, पाचोऱ्याचे सुपूत्र IAS मनोज महाजनांचा प्रवास तरुणाईसाठी प्रेरणादायी

राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने प्रेरणादायी प्रवासाची कहाणी...

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 12, 2023
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
इंजिनिअर ते IAS, पाचोऱ्याचे सुपूत्र IAS मनोज महाजनांचा प्रवास तरुणाईसाठी प्रेरणादायी

Photo Credit - Manoj Mahajan Facebook

पाचोरा, 12 जानेवारी : जिल्ह्यातील अनेक तरुण आज भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आहेत. तसेच अनेक जण परराज्यातही सेवा बजावत आहेत. यातच एक नाव म्हणजे पाचोरा तालुक्याचे सुपूत्र आयएएस अधिकारी मनोज महाजन. मनोज महाजन हे सध्या ओडिशा राज्यात सेवा बजावत आहेत. संपूर्ण तरुणाईला प्रेरणा मिळेल, असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आज राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात, आयएएस मनोज महाजन यांचा यशस्वी प्रवास.

नुकतीच मिळाली पदोन्नती –

मराठी मातीत जन्माला आलेले खान्देशच्या पाचोरा तालुक्याचे सुपूत्र मनोज महाजन हे सध्या ओडिशा राज्यात सेवा बजावत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना पदोन्नती मिळाली असून ते सध्या ओडिशातीलच सुंदरगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी/मुख्य विकास अधिकारी पदी सेवा बजावत आहेत. याआधी ते एसडीएम पदावर कार्यरत होते.

पाचोरा तालुक्यातील रहिवासी –

मनोज महाजन हे जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील रहिवासी आहे. त्यांच्यामध्ये आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती. त्यांचे इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षण पाचोरा तालुक्यातील गाळणच्या आश्रमशाळेत झाले. त्यांना दहावीत 91 टक्के गुण तर जळगाव येथील एम. जे. कॉलेजमध्ये बारावीत 92 टक्के मिळाले. तसेच यानंतर सीईटी परीक्षेत त्यांनी 176 गुण मिळवले. यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. पुण्यातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेतून पदवी मिळवली.

मनोज महाजन यांनी 2017 मध्ये यूपीएससी परीक्षा पास होत 903 रँक मिळवली होती. मात्र, त्यांना आयएएस सेवा मिळाली नव्हती. म्हणून त्यांनी पुन्हा आणखी जोमाने अभ्यास केला आणि 2019 मध्ये यूपीएससी परिक्षेत 125 वी रँक मिळवली. तसेच आयएएस सेवेला गवसणी घातली.

आपल्या जीवनात काहीतरी वेगळे करायचे त्यांनी ठरवले होते. त्यातूनच देशासह आपल्या गावाचे नाव मोठे करण्यासाठी मनोज यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्यासाठी पुणे येथील चाणक्य मंडळात अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली यूपीएससी परीक्षेची तयारी केली. आपल्या या यशाचे खरे गुरू व मार्गदर्शक माझे आई-वडिलच आहेत, असे ते सांगतात.

IAS मनोज महाजन यांचा तरुणाईला मोलाचा सल्ला

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आत्मविश्वास जिद्द, चिकाटी, परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळते. स्पर्धा परीक्षेत यशस्वीतेसाठी हिम्मत खचू देऊ नका. आत्मविश्वास, सोशिकता ठेवा, एकत्र अभ्यास करा, चांगले मित्र-मैत्रिणी यांची संगत धरा. विचारांची देवाण-घेवाण करा. छत्रपती व्हा. संधीचे सोने करा. ध्येय निश्चित करा, असा सल्ला ते स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तसेच तरुणांना देतात. त्यांचा हा जीवनप्रवास आजच्या तरुणाईला निश्चितच प्रेरणादायी आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias manoj mahajanmanoj mahajanmanoj mahajan iaspachora newspachora success storypatrakar din pachorasuccess story pachora

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा तहसील कार्यालयातर्फे सेवा पंधरवाड्यात लाभार्थ्यांना विविध सेवा त्वरित देण्याचा प्रयास – तहसीलदार भाऊसाहेब थोरात

चोपडा तहसील कार्यालयातर्फे सेवा पंधरवाड्यात लाभार्थ्यांना विविध सेवा त्वरित देण्याचा प्रयास – तहसीलदार भाऊसाहेब थोरात

September 13, 2025
गोवा विद्यापीठ व INCOIS यांच्यात सामंजस्य करार; आधुनिक तंत्रज्ञानामुळे मच्छीमारांची सुरक्षितता बळकट होणार: मुख्यमंत्री सावंत

गोवा विद्यापीठ व INCOIS यांच्यात सामंजस्य करार; आधुनिक तंत्रज्ञानामुळे मच्छीमारांची सुरक्षितता बळकट होणार: मुख्यमंत्री सावंत

September 13, 2025
Minister Jaykumar Rawal : कृषी विकासाला प्राधान्य देणारे शासन – पणन मंत्री जयकुमार रावल

Minister Jaykumar Rawal : कृषी विकासाला प्राधान्य देणारे शासन – पणन मंत्री जयकुमार रावल

September 13, 2025
जळगावात ‘धरतीआबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदि कर्मयोगी कार्यशाळा संपन्न

जळगावात ‘धरतीआबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदि कर्मयोगी कार्यशाळा संपन्न

September 13, 2025
राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर; जळगावात कुणाला संधी?

राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर; जळगावात कुणाला संधी?

September 12, 2025
Jalgaon News : जळगाव जिल्हा परिषदेत 86 उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती

Jalgaon News : जळगाव जिल्हा परिषदेत 86 उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती

September 12, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page