• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Padma Award 2026: पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ चौघं दिग्गजांसह 45 मान्यवरांचा सन्मान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 25, 2026
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Padma Award 2026: पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ चौघं दिग्गजांसह 45 मान्यवरांचा सन्मान

नवी दिल्ली, 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून सन 2026 साठीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात येणार असून यंदा महाराष्ट्रातील चार व्यक्तींनाही हा सन्मान मिळाला आहे.

लोककला व लोकनाट्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल प्रसिद्ध तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी श्रीरंग देवबा लाड यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यातील वारली लोकसंगीत कलाकार भिकल्या लाडक्या ढिंडा तसेच सामाजिक कार्यातील योगदानासाठी आर्मिदा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र सरकारने यंदा एकूण 45 मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी निवड केली असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सन्मानितांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांचा समावेश असून लोकनाट्य, लोककला, कृषी आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात येत आहे.

लोकनाट्य आणि तमाशा कला जपण्यासाठी रघुवीर खेडकर यांनी आयुष्यभर दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. सन 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी त्यांच्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांना पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले होते. तसेच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने विठाबाई (कांताबाई) आणि रघुवीर खेडकर यांना तमाशा सादर करण्याचा मानही मिळाला होता.

महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कारार्थी –

  • रघुवीर खेडकर
  • भिकल्या लाडक्या ढिंडा
  • श्रीरंग देवबा लाड
  • आर्मिदा फर्नांडीस

इतर पद्म पुरस्कारार्थी मान्यवर –

भगवंदास रायकर (मध्य प्रदेश), ब्रिज लाल भट्ट (जम्मू-काश्मीर), चरण हेम्ब्रम (ओडिशा), चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश), डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-काश्मीर), कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरल), महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा), नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा), ओथूवर तिरुथानी (तमिळनाडू), रघुपत सिंह (उत्तर प्रदेश), राजस्तापती कालीअप्पा गौंडर (तमिळनाडू), सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड), थिरुवरूर बख्तवसलम (तमिळनाडू), अंके गौडा (कर्नाटक), डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश), गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान), खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा), मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात), मोहन नगर (मध्य प्रदेश), नीलेश मंडलेवाला (गुजरात), आर. अँड एस. गोडबोले (छत्तीसगड), राम रेड्डी ममिडी (तेलंगणा), सिमांचल पात्रो (ओडिशा), सुरेश हनागवाडी (कर्नाटक), तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश), युनम जत्रा सिंह (मणिपूर), बुधरी ताथी (छत्तीसगड), डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगणा), डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तमिळनाडू), हैली वॉर (मेघालय), इंदरजीत सिंह सिद्धू (चंदीगड), के. पाजनिवेल (पुडुचेरी), कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश), नुरुद्दीन अहमद (आसाम), पोकीला लेकटेपी (आसाम), आर. कृष्णन (तमिळनाडू), एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक), टागा राम भील (राजस्थान), विश्व बंधु (बिहार), धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात) आणि शफी शौक (जम्मू-काश्मीर).

या सर्व मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांच्या यशामुळे राज्याचा गौरव अधिक उंचावला आहे.

हेही वाचा : किस्से लोकभवनाचे – लेख क्र.- 15 | किस्सा राज्यपालांच्या ‘कुर्सी’चा

बातमी शेअर करा !
Share
Tags: breaking newsmarathi newsPadma Awardspadma awards 2026suvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page