जळगाव, 25 डिसेंबर : धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे अध्यात्मिक गुरू बागेश्वर धाम उर्फ पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या हनुमंत कथेला उद्यापासून सुरूवात होणार आहे. 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर असे पाच दिवसीय कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव एसटी महामंडळकडून आठ ठिकाणांहून बससेवा उपलब्ध करण्यात आली असून त्यासाठीचे दर देखील निश्चित केले आहेत.
कथेला जाण्यासाठी बससेवा उपलब्ध; नेमके दर किती? –
पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमंत कथेला जाणाऱ्या भाविकांसाठी एकूण 300 बस उपलब्ध करण्यात आल्या असून त्यासाठीचे दर खालीलप्रमाणे असणार आहेत.
- जळगाव ते कथास्थळ – 30 रुपये
- पाळधी ते कथास्थळ – 15 रुपये
- धरणगाव ते कथास्थळ – 30 रुपये
- अमळनेर ते कथास्थळ – 80 रुपये
- चोपडा ते कथास्थळ – 80 रुपये
- भुसावळ ते कथास्थळ – 80 रुपये
- जामनेर ते कथास्थळ – 95 रुपये
- पाचोरा ते कथास्थळ – 125 रुपये
दरम्यान, कथास्थळी येणारी भाविकांची संख्या बघता अतिरिक्त बसेसचे देखील व्यवस्था केली जाणार आहे.
झुरखेड्यात भव्य आयोजन –
झुरखेड्यात धीरेंद्र शास्त्री पंडित यांच्या हनुमंत कथेसाठी जिल्हा प्रशासनासह आयोजिक समितीकडून पुर्ण तयारी केली असून पहिल्याच दिवशी 3 लाखांपर्यंत भाविक कथास्थळी हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. एकूण 100 एकरच्या परिसरात या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 5000 स्वयंसेवक देखील कथास्थळी सेवा देणार आहेत. दरम्यान, पावसाची शक्यता पाहता भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे.
हेही पाहा : Mla Anil Patil: मंत्रिमंडळातून का वगळलं, अनिल पाटलांनी सांगितलं यामागचं कारण, नागपुरातून विशेष संवाद