सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 29 ऑगस्ट : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगांव रंजे येथे येथे भरदिवसा तलाठी कार्यालयात तलाठी संतोष देवराव पवार यांचा शासकीय कामकाज करत असतांना चाकू भोसकुन खुन करण्यात आला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्ध आज सकाळी पारोळा येथे 11 वाजता तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांना पारोळा तलाठी संघटना व महसूल कर्मचारी संघटनेकडून निवेदन देण्यात आले.
तलाठी हत्येचा निषेधार्थ तहसिलदारांना निवेदन –
हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजे येथे तलाठी कार्यालयात तलाठी संतोष देवराव पवार यांचा चाकू भोसकून खून करण्यात आला होता. दरम्यान, पारोळा तलाठी संघटना व महसूल कर्मचारी संघटनेकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. एकंदरीत कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नसताना महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यासोबत खुनाची घटना घडल्याचा प्रकार अत्यंत भ्याड, निंदणीय व घृणास्पद असुन यामध्ये आरोपीची मानसिक विकृती दिसुन येत असल्याचे म्हणत तलाठी संघटना व महसूल कर्मचारी संघटनेकडून या घटनेच्या निषेधार्थ तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांना निवदेन दिले.
यावेळी तलाठी संघाने एक दिवस काम बंद आंदोलन केले तर कर्मचारी संघटनेने काळ्या फित लाऊन कामकाज केले. यावेळी तलाठी संघाचे जिल्हा चिटणीस निशिकांत माने, प्रविण शिंदे, सुभाष वाघमारे, तसेच महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुदाम भालेराव, महेश जाधव, गणेश नाईक, श्री गिरासे, अतुल बागुल व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा : पाचोऱ्यात गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास