• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 11, 2026
in महाराष्ट्र, चाळीसगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

मुंबई, 11 मार्च: राज्यातील शासकीय कामकाजाचा वाढता व्याप, जिल्ह्यांतील वाढती लोकसंख्या तसेच दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासनिक सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदनाद्वारे दिली. दरम्यान, यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्यातील लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निवेदने, जिल्ह्यांची लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, जिल्ह्यातील दुर्गम भाग, तालुक्यांची संख्या, प्रशासकीय सोयीसुविधा आणि स्थानिक परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.

या प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या ९ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत राज्यात ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. तसेच प्रत्येक कार्यालयासाठी आवश्यक पदनिर्मितीसही मान्यता देण्यात आली. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत अपर जिल्हाधिकारी संवर्गातील एस-२५ वेतनश्रेणीतील ११ नवीन पदे  व  प्रत्येक कार्यालयात एकूण १३ पदे या प्रमाणे १४३ पदे निर्माण करण्यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयानुसार  ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.या निर्णयामुळे प्रशासन अधिक सक्षम होऊन नागरिकांना शासकीय सेवा जलद आणि प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होईल, असे मंत्री महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा: कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

बातमी शेअर करा !
Share
Tags: additional district collector officesmarathi newsminister chandrashekhar bawankulesuvarna khandesh livevidhansabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

June 19, 2026
शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

June 19, 2026
धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पीएच.डी. संशोधकांसाठी 10 दिवसीय पूर्व-पीएच.डी. संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

June 18, 2026
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

June 18, 2026
अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page