• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुक्यातील सांगवी गावाजवळील पुलाच्या कामामुळे एसटी बसच्या प्रवाशांचे हाल, पाचोरा काँग्रेस धावली मदतीला

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 26, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील सांगवी गावाजवळील पुलाच्या कामामुळे एसटी बसच्या प्रवाशांचे हाल, पाचोरा काँग्रेस धावली मदतीला

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 26 जून : पाचोरा तालुक्यातील सांगवी गावाजवळील नवीन पुलाचे काम चालू असल्याने या पुलाचा बायपास निकृष्ट असल्याने बस सेवा रद्द करण्यात आली. रात्रीच्या वेळी प्रवाशांचे हाल होत असतांना प्रवाशांनी काँग्रेस तालुकाध्यक्षांना सांगताच धाव घेऊन अखेर बस सोडण्यास भाग पाडले. दरम्यान, पुलाचा वापर पंधरा दिवसात न झाल्यास पाचोरा काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
तालुक्यातील पाचोरा ते लोहारा रस्त्यावर नाईक नगर गावाच्या पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. यातच पुलासाठी जो अंदाजपत्रकामध्ये बायपास रस्ता केलेला होता, तो निकृष्ट असल्यामुळे पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात सदर बायपास रस्त्याचे काम खराब झाल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे जिकरीची झाले आहे. त्यामुळे कुऱ्हाड, लोहारा, कळमसरा कासमपुरा, या गावांना जाणे ग्रामस्थांना अवघड झाले आहे. सदर पुलाचे काम झाले नसल्याने काल रात्रीच्या सुमारास कुऱ्हाड सांगवी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

यावेळी बस स्थानकावर जवळपास 60 ते 70 प्रवासी आपापल्या गावी जाण्यासाठी बसून होते. यावेळी गोंदेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील यांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना प्रवाशांचे हाल होत असल्याबद्दल तातडीने बस स्थानकावर यावे, असे सांगितले असता, सचिन सोमवंशी तात्काळ बस स्थानकावर दाखल झाले. यावेळी लोहारा, कुर्‍हाड, सांगवी येथील प्रवाशांची चर्चा करून बस स्थानक प्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली व तात्काळ बस सोडण्याची आग्रही मागणी केली.

दरम्यान, पाचोरा वरखेडी लोहारा अशी एक बस सोडण्यात आली. तसेच पाचोरा ते सांगवीपर्यंत एक बस पाठवण्यात आली. प्रवाशांना बसची व्यवस्था झाल्यामुळे रात्री नऊ वाजता सर्व प्रवासी महिला, पुरुष, वयोवृद्ध यांनी आपापल्या गावाकडे रवाना झाले. वयोवृद्ध लोकांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना भरभरून आशीर्वाद दिले.

पाचोरा काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा –
सदर पुलाबाबत काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दीपक पाटील यांच्याशी संपर्क साधून येत्या पंधरा दिवसात पुलाची रहदारी सुरू न झाल्यास काँग्रेस पक्षाकडून पुलाच्या जागेवरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : लासगाव बरडी सोलर प्रकल्पावर जळगावचे कलेक्टर आयुष प्रसाद यांची विशेष मुलाखत. 

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora bus standpachora congresspachora taluka latest newssachin somwanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

April 17, 2026
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

April 17, 2026
‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 17, 2026
पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

April 17, 2026
कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

April 17, 2026
जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page