नागपूर, 11 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण होणार आहे. नागपूर ते शिर्डी असा 521 किमीचा हा पहिला टप्पा आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.
मोदी करणार 10 किमीचा प्रवास –
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या समृद्धी महामार्गावरुन 10 किमीचा प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते 55 हजार कोटींचा खर्च असलेला समृद्धी महामार्ग देशाला समर्पित केला जाणार आहे. यासाठी प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा असा असणार
सकाळी 7.50 वाजता दिल्लीहून रवाना
सकाळी 9.25 वाजता नागपूर एअरपोर्टवर पोहोचणार
सकाळी 9.40 वाजता नागपूर रेल्वेस्थानकात पोहोचणार
सकाळी 9.55 वाजता नागपूर रेल्वे स्थानकाहून निघणार
सकाळी 10 वाजता फ्रीडम मेट्रो स्टेशनला पोहोचणार
सकाळी 10.10 वाजता मेट्रो प्रदर्शनाची पाहणी
सकाळी 10.20 वाजता खापरी मेट्रो स्टेशनला पोहोचणार, मेट्रोच्या 2 टप्प्यांचं उद्घाटन
सकाळी 10.30 वाजता खापरीहून रस्तेमार्गे समृद्धी महामार्गाकडे रवाना
सकाळी 10.45 वाजता समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटला आगमन
सकाळी 11 वाजता समृद्धी महामार्गावर 10 किमी प्रवास
सकाळी 11.15 वाजता मिहान, एम्समध्ये आगमन
सकाळी 11.30 वाजता विविध योजनांचं उद्घाटन
दुपारी 12.35 वाजता नागपूर एअरपोर्टकडे मार्गक्रमण
दुपारी 12.55 वाजता गोव्यासाठी विमानाने प्रस्थान