चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 17 मे : काँग्रेसच्या माओवादी जाहीरनाम्यातील घोषणांचा विचार केला तर देश दिवाळखोर होईल, यांची नजर देशाच्या मंदिरातील सोन्यावर आहे, यांची नजर महिलांच्या मंगळसूत्रावर आहे, तुम्ही किती कमाई केली असेल तर अर्धी संपती सरकार हिसकावून घेऊ इच्छिते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काँग्रेससाठी ही अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे.
आज विश्वासघात आघाडी पाहून, बाळासाहेबांच्या आत्म्याला दु:ख होत असेल. या नकली शिवसेनेच्या लोकांनी बाळासाहेबांच्या धोका दिला. यांनी शिवसेनेच्या बलिदानाला धोका दिला. सत्तेसाठी हे राम मंदिराला शिवी देणाऱ्यांच्या सोबत गेले. सत्तेसाठी हे लोकं मुंबई हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्या लोकांसोबत गेले. जे काँग्रेस वीर सावकरांना शिवी देते, त्यांच्या मांडीवर बसले. मी एनसीपीच्या लोकांना आव्हान देते की राहुल यांच्याकडून एक वक्तव्य बोलवून घ्या की आयुष्यात एकदाही सावरकरांचा अपमान करणार नाही. आता ते निवडणूक आहे म्हणून शांत आहेत. मात्र, हे व्यक्तव्य बोलवून घ्या. ते नाही करू शकत.
महाराष्ट्राच्या मातीसोबत धोका करणारे लोक, महाराष्ट्राच्या गौरवला ठेच पोहोचवणारे लोक, आज तेच नकली शिवसेनेचे लोक सीएएचा विरोध करत आहेत. हिंदूस्तानात असे हृदय परिवर्तन कोणत्याही पार्टीचे नाही झाले, जसे आताच्या नकली शिवसेनेचे झाले. आपल्या मतदारांना खुश करणाऱ्यासाठी या आघाडीने मुंबईला, देशाला धोका दिला. ज्या कसाबने मुंबईकरांना धक्का दिला, हे लोक त्याला क्लीन चीट देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धरतीचा हा सर्वात मोठा अपमान आहे.
संविधानाचा अपमान ते करत आहेत. बाबासाहेब धर्माच्या आधारावर आरक्षणाचा विरोधात होते. मात्र, इंडिया आघाडीवाले दलित, ओबीसी, आदिवासी यांचे अधिकाराचे आरक्षण हिसकावून वोट जिहाद करणाऱ्यांना देऊ इच्छित आहेत. सत्तेसाठी यांची धोकेबाजी चालणार नाही. कलम 370 रद्द करुन देशात एक संविधान लागू करणारा मोदी हा संविधानाचा सर्वात मोठा रक्षक आहे. तसेच जे लोक आज संविधानाला डोक्यावर घेऊन नाचत आहेत त्यांनी आधी संविधानाच्या शरीराला तोडले. पहिली प्रत त्यामध्ये एक हिस्सा आहे, संविधानाबाब लिहिलेल्या बाबी आणि चित्रकाम आहे. हे सर्व मिळून एक संविधान तयार झाले. यामध्ये हजारो वर्षांचा इतिहास आहे. मात्र, नेहरुंनी हे चित्र असणारे संविधान कपाटात बंद करून ठेवले. आता हे लोकं संविधानासोबत विश्वासघात करू इच्छित आहे. मी काँग्रेसला दलित, मागासवर्गीय, आदिवासीचे आरक्षण हिसकावू देणार नाही. ही मोदींची गॅरंटी आहे, असे ते म्हणाले.
या ड्रीम सिटीत मी तुमच्यासाठी 2047 च्या ड्रीम घेऊन आलो आहे. देशाचे स्वप्न आहे, देशाचा संकल्प आहे आपण सर्वांनी मिळून विकसित भारत बनवायचा आहे. यामध्ये मुंबईची मोठी भूमिका आहे. मुंबईच्या लोकांना वेगाची किंमत सर्वात जास्त कळते. भारतासोबत स्वातंत्र्य मिळालेले अनेक देश पुढे गेले. पण आपण कुठे मागे राहिलो, कमतरता त्या सरकारमध्ये होती, ज्यांनी भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही. मी असेही पंतप्रधान पाहिले की, मी तुम्हाला सांगेन की, यूट्यूबवर जाऊन लाल किल्ल्याला आतापर्यंत कोण पंतप्रधान काय बोलले, हे सर्व उपलब्ध आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा देशाचे पंतप्रधान भारतीयांना आळशी म्हणायचे. जे सरकारची विचारधारा अशी असेल, ते देशाला कधीच पुढे घेऊन जाऊ शकत नाही. मी गंभीरतेने सांगतो की, स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्ल्यावर जर काँग्रेसला भंग केले गेले असते तर आज भारत 5 दशक पुढे असता. स्वातंत्र्यानंतर भारताची सर्व व्यवस्था जे काँग्रेसीकरण झाले त्यांनी देशाचे 5 दशक बरबाद केले. देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा भारत जगात 6 व्या क्रमांकावर होता. 2014 मध्ये जेव्हा काँग्रेस गेली आणि आम्हाला सत्ता मिळाली, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था ही 11 व्या क्रमांकावर होती. जेव्हापासून तुम्ही या सेवकाला संधी दिली, आज देश जगातील 5 व्या क्रमांकाची आर्थिक ताकद बनला आहे.
आज भारतात रेकॉर्ड गुंतवणूक होत आहे. येत्या काही काळात, जेव्हा मी तुमच्यात येईल, तेव्हा आपण जगातील 3 ऱ्या क्रमांकावर पोहोचले असू. मी तुम्हाला गॅरंटी द्यायला आलो आहे. मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाणार आहे. यासाठी मोदी 24*7 फॉर 2047 या मंत्रानुसार प्रत्येक क्षण तुमच्यासाठी देशासाठी कार्य करत आहे.
काही लोकं म्हणतात की, मोदी जे म्हणतो ते असंभव आहे, ते निराशेत डुबलेले आहेत. त्यांना आशेचा संचार करणे लोखंडाचे फुटाणे खाण्यासारखे आहे. निराशेत डुबलेले लोक प्रत्येक क्षणी असंभवच अनुभव करतात. हे ते लोकं आहेत, ज्यांना राम मंदिरही त्यांना असंभव वाटत होते. जगाला कधी ना कधी या गोष्टीला स्विकारावे लागेल की, भारतात राहणारे लोक आपल्या विचारांचे पक्के होते, आपल्या निर्णयाचे पक्के होते की, एक स्वप्न घेऊन 500 वर्षे लढत राहिले. हा लहान इतिहास नाही. 500 वर्षांचा अविरत संघर्ष, लाखो लोकांचे बलिदान आणि 500 वर्षांचे स्वप्न आज रामलला भव्य मंदिरात विराजमान आहेत.
हे निराशेत डुबलेले लोक, ज्यांना कलम 370 रद्द होणे, अशक्य वाटत होते. आज आपल्या डोळ्यांसमोर कलम 370 च्या भितींला मी कबरस्तानात गाडले. तसेच जे स्वप्न पाहत आहेत की जे पुन्हा कलम 370 लागू करू, त्यांना कान खोलून ऐकावे, ही संपत्ती सामान्य संपत्ती नाही. जगातील कोणतीही ताकद पुन्हा कलम 370 लागू करू शकत नाही. आपला देश दशकांपर्यंत बॉम्बस्फोटात हादरायचा. मुंबई शहर हादरायचे. लावारिस वस्तूला हात लावू नका, असे ऐकायला यायचे. मात्र, 10 वर्षात असं काही ऐकायला आले का. हे सर्व या लोकांना अशक्य वाटायचे.
महिलांना 33 टक्के आरक्षण 40 वर्षे वाट पाहिले. जे आज संविधानाला डोक्यावर घेऊन नाचत आहेत, त्या लोकांनी 33 टक्के आरक्षणाच्या विधेयकाला फाडले होते. या सर्वांच्या छातीवर बसून आरक्षण आले. काँग्रेस 60 वर्षे बोलत राहिली, गरीबी हटवू. यांची तर फॅशन होती की, जे इतिहासात रुची घेत असतील त्यांनी पाहावे, लाल किल्ल्यावरील भाषण ऐकली तर 20-25 ते गरीबीवर बोलायचे. त्यांची निवडणुकीच्या भाषणात गरीबीची माळा जपायचे. गरिबांना जाणीव करुन द्यायचे की तुम्ही गरीबीत जगायला जन्माला आले आहोत. या देशात गरीबीला हटवणे अशक्य वाटायचे. पण मोदीने 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढून दाखवले.
जे अशक्य वाटायचे, ते शक्य झाले. ये कुणी शक्य केले, कोणत्या शक्तीने हे केले, मोदी नाही तर ही तुमच्या मताची शक्ती आहे. हे तुमच्या मताचे सामर्थ्य आहे. ज्यांना आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य हवे आहे, ज्यांना शांती आणि सुरक्षा हवी, विकासाच्या संधी हव्या आहेत, अशा प्रत्येक नागरिकाला सांगेन की घराबाहेर या आणि आपल्या मताचा वापर करा. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमचा आशिर्वाद मागायला आलोय. रेकॉर्डब्रेक मतदान करा. मतदान करायला जाताना त्या बॉम्बस्फोटाची आठवण करा. आज तुम्ही सुरक्षित घरी येऊ शकतात, हे लक्षात घ्या आणि महायुतीला मतदान करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या लोकांनी जेव्हा जनादेश चोरून सरकार बनवले, मी महाराष्ट्राबाबत बोलतोय, जनादेश चोरून सरकार बनवले तर विकास कार्यांशी आपले शत्रूत्व काढले. बुलेट ट्रेनचे काम असेल, मुंबई मेट्रोचे काम असेल, कोरीडोर असेल, जेएनपीटीचं काम असेल यांनी अटकवले, लटकवले. हे मुंबईच्या लोकांशी शत्रुत्व निभावत होते. मोदी मुंबईला त्यांचा हक्क परत करायला आला आहे.
मागील दहा वर्षात सव्वालाख पेक्षा जास्त स्टार्टअप बनले आहेत. 8 हजार पेक्षा जास्त स्टार्ट फक्त मुंबईत आहेत. मागील 10 वर्षात मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जगातील दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. येणाऱ्या 5 वर्षात तरुणांसाठी अनेक संधी बनणारा देश बनला आहे. याचा फायदा मुंबईच्या लोकांना होईल. आमचं सरकार, मातृभाषेच्या शिक्षणाला चालना देत आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार, आता मराठीतही मेडिकल आणि इंजिनीअरींगचे शिक्षण शक्य होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा : पुढच्या पाच वर्षांसाठी राज ठाकरेंच्या नरेंद्र मोदींकडे 3 मागण्या; वाचा, एका क्लिकवर