नाशिक, 28 मे : नाशिकमधून बनावट छापल्याची मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला अंबड पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत या टोळीचा पर्दाफाश केला. आरोपींनी या नोटा चलनात आणल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये बनावट नोटा छापण्याचे काम एका टोळीकडून सुरू होते. यामध्ये खऱ्या नोटा स्कॅन करून प्रिंटरवरून त्याच्या प्रिंट काढून बनावट नोटा तयार करण्यात येत होत्या. पोलिसांना या प्रकरणाची माहिती झाली. दरम्यान, अंबड पोलिसांनी पाचशेच्या बनावट तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करताना या टोळीला रंगेहाथ अटक केली.
तीन जणांना अटक –
नंदकुमार मुरकुटे, अशोक पगार आणि हेमंत कोल्हे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सिन्नरच्या एका हॉटेलमध्ये प्रिंटरच्या मदतीने पाचशेच्या बनावट नोटा छापल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. या आरोपींकडून पाचशे रुपयांच्या 47 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांनी बनावट मोठा छापण्यासाठी वापरण्यात आलेला प्रिंटर आणि लॅपटॉप देखील जप्त केले आहे.
आरोपींनी दिली कबुली –
बनावट नोटा छापणाऱ्या टोळीने पाचशेच्या दोन बनावट नोटा खऱ्या नोटांमध्ये लपवल्या होत्या. त्यांनी त्या एका खाजगी बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये चलनात देखील आणल्याची कबुली दिल्याचे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : “पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!”, नाना पटोलेंची मागणी, काय आहे संपूर्ण बातमी?