चंद्रकांत दुसाने, प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी अपघात प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणी मुंबईतून 2 जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 27 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी –
जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी अपघात प्रकरणातील तिसरा आरोपी ध्रुव सोनवणे याला 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जळगावच्या रामदेव वाडी येथे भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने महिलेसह तीन मुलांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणात यापूर्वी अटकेतील दोन जणांना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर आता या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीलाही न्यायालयाने 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा न्यायालयात कामकाजा दरम्यान या अपघातात तिसरा आरोपी ध्रुव सोनवणे याचे नाव समोर आले होते. यानंतर ध्रुव सोनवणे याला अटक करण्यात आली. आज त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायालयाने ध्रुव सोनवणे याला 27 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ध्रुव सोनवणे हा कारमध्ये मागच्या सीटवर बसलेला असल्याचा वकिलांनी युक्तिवाद केला. त्यामुळे चौथ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी ध्रुव सोनवणे याच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली होती. आज वकिलांच्या युक्तिवादानंतर जिल्हा न्यायालयाने ध्रुव सोनवणे याला 27 मेपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रामदेववाडी अपघात प्रकरण –
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे आशा वर्कर असलेल्या वत्सला सरदार चव्हाण या काम संपवून मुलगा सोहम (वय 8), सोमेश (वय 2) सर्व ह. मु. रामदेववाडी, ता. जळगाव) व भाचा लक्ष्मण नाईक (वय 17), रा. मालखेडा, ता. जामनेर) हे 7 मे रोजी दुचाकीने शिरसोली येथे येत होते. रामदेववाडी गावाच्या पुढे भरधाव कारने (क्र. एम.एच. 19 सी.व्ही. 6767) चव्हाण यांच्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत वत्सला (27) व मुलगा सोमेश चव्हाण (2) हे दोघे जागीच ठार झाले होते. सोहम चव्हाण (8) आणि गंभीर जखमी लक्ष्मण राठोड (17) यांचा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी अपघात प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणी मुंबईतून 2 जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 27 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा : दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, भीषण अपघातात पाचोरा तालुक्यातील बाळद येथील तरुणाचा मृत्यू