ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 एप्रिल : देशासह राज्याभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तसेच मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानला जाणारा रमजान महिना देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे व पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या नेतृत्वात पाचोरा शहरातून पोलीसांच्यावतीने रूट मार्च काढण्यात आला.
पाचोरा शहरात रूटमार्च –
लोकसभा निवडणुक व रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे व पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षक दलाच्या जवानांसह पाचोरा शहरात रूटमार्च काढण्यात आला. हा रूटमार्च श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रकाश टॉकीज चौक, मच्छी बाजार, आठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड परिसरात काढण्यात आला.
पाचोरा शहरात रूटमार्च काढण्यात आलेल्या रूटमार्चमध्ये पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण यांच्यासह पाचोरा पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी सहभाग घेतला.
हेही वाचा : दिंडोरी-नाशिक मार्गावर भीषण अपघात! बोलेरो आणि बाईकच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू; 4 जण गंभीर जखमी