• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यातील अतिक्रमित घरे मोजणी प्रक्रियेला उद्या आमदार किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते सुरुवात

पाचोरा शहरातील सुमारे 3500 अतिक्रमित मालमत्ता धारकांना मिळणार लाभ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 30, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोऱ्यातील अतिक्रमित घरे मोजणी प्रक्रियेला उद्या आमदार किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते सुरुवात

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 30 जानेवारी : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनाने पाचोरा शहरातील शासकीय जागेवरील सुमारे 3500 अतिक्रमित घरे नियमानुकूल करून नावावर लावण्या बाबतची कार्यवाही सुरू होत असून उद्या शुक्रवारी सकाळी 10 वाजता शहरातील जनता वसाहत भागातील धम्मोदय बौद्ध विहार भागातून मोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
पाचोरा शहराचे काही टप्पे केले असून पहिल्या टप्यात शहरातील जनता वसाहत भागातील सुमारे 250 घरांच्या मोजणी होणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे अतिक्रमित घरे नावावर होण्याची आस लाऊन बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

नेमकी बातमी काय? –
शासनाचे 2011 पूर्वीची सरकारी जमिनीवरील रहिवासी क्षेत्रातील घरांचे अतिक्रमण नियमनाकुल करण्याचे धोरण आहे. मात्र याबाबत कार्यवाही होत नसल्याने अतिक्रमण धारकांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेत विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा व भडगाव शहर हद्दीतील सर्वच शासकीय जागेवरील अतिक्रमित धारकांची घरे नावावर लावण्याबाबत शासकीय आदेशाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशित केल्याने पाचोरा नगरपरिषद प्रशासनाने आवश्यक मोजणी फी भरून मोजणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

दरम्यान, पाचोरा व भडगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील सुमारे सात हजार अतिक्रमण घरे असून टप्प्याटप्प्याने ही घरे नावावर लावण्यात येणार आहेत. मोजणी प्रक्रियेसाठी स्वतः मुख्याधिकारी मंगेश चव्हाण, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक एम व्ही तोटावार, शहर अभियंता भय्यासाहेब पाटील, पालिकेचे उपमुख्याधिकारी डी एस मराठे, दुर्गेश सोनवणे, नगररचना विभागाचे धीरज नेटके यांचेसह भूमिअभिलेख व नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती असणार आहे. तरी अतिक्रमित मालमत्ता धारक बांधवानी या मोजणी प्रक्रियेत सर्व कर्मचारी वर्गाला सहकार्य करून मोजणी प्रक्रिया सुलभपणे पार पाडून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले आहे.

सात हजार मालमत्ता धारकांना लाभ –
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने आपण पाऊल टाकले असून पाचोरा व भडगाव शहर नगरपालिका हद्दीतील अतिक्रमित घरे नावावर लावण्याची प्रक्रिया नगरपरिषदेने सुरू केली असून टप्प्याटप्प्याने पाचोरा व भडगाव शहरातील सरकारी जागेवरील सुमारे सात हजार मालमत्ता धारकांना त्याचा लाभ होणार आहे. यामुळे गोरगरीब जनतेला आपण लाभ मिळून देणार असल्याचे आपल्याला मनस्वी समाधान असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितलंय.

हेही वाचा : महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्ताने महात्मा गांधी यांचे पणतू आणि लेखक श्री. तुषार गांधी यांची विशेष मुलाखत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: encroached housesmarathi newsmla kishor appa patilpachora latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page