ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 11 डिसेंबर : परभणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान व संविधान विरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याची घटना घडली. दरम्यान, परभणीतील घडलेल्या घटनेचा आज पाचोऱ्यात जाहीर निषेध करण्यात आला. तसेच दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
परभणीतील घटनेचा निषेध –
परभणी शहरात काल मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय ते बस स्टँड रोड येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आहे. त्या ठिकाणी असलेल्या भारतीय संविधानाच्या संदेशक प्रतिकृतीची एका माथेफिरू कडून मोडतोड होऊन संविधान विरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेचा आज पाचोऱ्यात जाहीर निषेध करण्यात आला असून पोलीस निरीक्षक तसेच प्रांताधिकारी यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन द.
दोषींवर कारवाईची मागणी –
मुख्यतः शहरात प्रशासकीय व मुख्य चौक परिसरात अशा पद्धतीने घटना घडते व तेही भारतीय संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या सुरुवातीस अशा पद्धतीने विकृत व अवमानकारक कृत्य होत असेल तर आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात खऱ्या स्वातंत्र्यात आहोत काय, हा खरा प्रश्न उभा राहतो. सध्या शहराशहरात जे मोर्चे निघत आहे त्यामुळे कुठेतरी समाज मनात तेढ निर्माण तर होत नाही ना ? हे देखील तपासणी गरजेचे झाले आहे. त्यामुळे सदर घडलेल्या घटनेची मुळ पार्श्वभूमी तपासून सक्षम यंत्रणे कडून चौकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी समस्त संविधान प्रेमी व आंबेडकर प्रेमी जनता मागणी करीत असल्याचे निवदेनात म्हटले आहे.
निवदेनावर प्रविण ब्राम्हणे, सुनिल कदम, जगन निकम, मयुर ब्राम्हणे, सागर अहिरे, रितेश अहिरे, आनंद सोनवणे, सोनु बागुल, चेतन बडगूजर, अमोल कदम, विक्की मोरे, भुकेश पगारे, अजय साळवे, विक्की बाविस्कर, अजय सोनवणे, विकास सोनवणे, प्रदीप जाधव, भीमराव खैरे, संजीवनी रत्नपारखी, संगिता साळुंखे, स्मिता भिवसने, प्रती सोनवणे, माया केदार, आदींच्या सह्या आहेत.