अमळनेर, 24 एप्रिल : शेतमालाची आवक वाढल्याने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व समितीच्या लागून असलेला धुळे रोड वर मका, हरभरा, गहू, बाजरी, इ . नी भरलेले वाहन, ट्रॅक्टर, माल वाहतूक गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्याची माहिती समोर आली आहे.
अमळनेर बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल रोख स्वरूपात घेतला जातो व भावही चांगला मिळतो. यामुळे अमळनेर तालुक्यासह पारोळा, धरणगाव, भडगांव, पाचोरा, शिंदखेडा इत्यादी तालुक्यातून शेतकरी आपला शेतीमाल अमळनेर बाजार समितीत आणतात.
दरम्यान, शेतमालाची आवक वाढल्याने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांना तात्कळत बसण्याची वेळ येत आहे. दरम्यान, बाजार समितीचे व्यापारी, संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग ही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी लवकर वाहन खाली व्हावे यासाठी पुढाकार घेतात. काही व्यापारी तर थेट दिल्लीहून आल्याचे समजते.
हेही वाचा : Special Interview : जळगावच्या डॉ. नेहा राजपूत UPSC मध्ये देशात 51 व्या, तरुणाईला दिला हा मोलाचा सल्ला