सांगली, 5 सप्टेंबर : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मागितलेली माफी ही भ्रष्टाचारासाठी की आरएसएसच्या माणसाला कंत्राट म्हणून माफी, असा सवाल उपस्थित करत तुम्ही चुका करतात म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते, असा निशाणा त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर लगावला. ते सांगलीत बोलत होते.
सांगलीत राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका –
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघरमध्ये छत्रपती शिवाजी महारांजासह शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली होती. दरम्यान, आज सांगलीत काँग्रेसचे दिवंगत नेते पंतगराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि स्मारकाचे लोकार्पण सोहळा राहुल गांधी यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींनी मागितलेल्या माफीवरून त्यांच्यावर टीका केली.
माफी मागण्याची कारणं काय? –
राहुल गांधी म्हणाले की, काही दिवसांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला गेला. मी वर्तमानपत्रात वाचलं की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली. मी आता समजू इच्छितो की, पंतप्रधान यांनी का माफी मागितली. आरएसएसच्या लोकांना योग्यतेशिवाय कंत्राटे देणे, पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याबद्दल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या पूज्य महापुरुषाचा अपमान करणे, अशी वेगवेगळी कारणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागण्यामागे असू शकतात.
त्यांनी यांची माफी मागितली पाहिजे –
सर्वात मोठे महापुरूष शिवाजी महाराजांचा पुतळा बनतोय. अन् काही दिवसातच चुकीच्या व्यक्तीला कंत्राट दिल्याबद्दल किंवा भ्रष्टाचारामुळे पुतळा कोसळतो. मात्र, पुतळा कोसळण्याचे कारण काहीही असो, पंतप्रधान आणि भाजप हे शिवाजी महाराजांसह संपूर्ण महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत – त्यांनी आपल्या वर्तनाची आणि भ्रष्टाचाराची राज्यातील प्रत्येक नागरिकाची माफी मागितली पाहिजे. दरम्यान, मोठ्यात मोठे कंत्राट हे अदानी-अंबानी यांना दिले जात असल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. खेडेगावांचे कंत्राट गुजरातला कसे मिळते, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
पतंगराव कदमांबाबत काय म्हणाले? –
राहुल गांधी पुढे म्हणाले की, नफरत की राजनीती नको असून आम्हाला भाईचारा पाहिजे. पतंगराव कदम यांनी आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेस आणि महाराष्ट्राला दिले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले तसेच ते काँग्रेस पक्षातसोबत राहिले. इंदिरा गांधी निवडणूक हरल्यानंतरही ते सोबतच राहिले. दरम्यान, पंतगराव यांचा हा पुतळा पुढील 60 ते 70 वर्षानंतरही असाच राहणार, असे राहुल गांधी यांनी पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी सांगितले.
हेही वाचा : “मी, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो”, पालघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?