• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधानसभा निवडणूक 2024; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ चार मतदारसंघात महायुतीत बंड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 25, 2024
in ताज्या बातम्या, एरंडोल, जळगाव जिल्हा, पाचोरा, पारोळा
मोठी बातमी! विधानसभा निवडणूक 2024; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ चार मतदारसंघात महायुतीत बंड

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 25 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरूवात झालीय. महायुतीत जळगाव जिल्ह्यातील जागावाटप पुर्ण झाले आहे. असे असताना महायुतीतील भाजपकडून ज्या इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळालेले नाही त्यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

भाजपमधील ‘या’ चार मतदारसंघात महायुतीत बंड –

एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघ – ए.टी.पाटील
भाजपचे माजी खासदार ए.टी. पाटील यांनी जळगाव लोकसभेचे सलग दहा वर्ष प्रतिनिधित्व केले होते. 2009 आणि 2014 ला ते लोकसभेत मोठ्या मताधिक्याने निवडून गेले होते. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापत उन्मेश पाटील यांना तिकीट देण्यात होते. असे असताना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळी भाजपने उन्मेश पाटील यांचे तिकीट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आणि त्या लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्या. दरम्यान, आता माजी खासदार यांनी एरंडोल पारोळा मतदारसंघातून भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय. एरंडोल पारोळा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेच्या वाटेला आल्याने त्यांना हा निर्णय घेतलाय.

अमळनेर विधानसभा मतदारसंघ – शिरीष चौधरी
राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महायुती असून अमळनेर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या वाटेला आला आहे. या मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. दरम्यान, त्यांनी काल 24 ऑक्टोबर रोजी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर भाजपचे शिरीष चौधरी यांनी बंड पुकारत अनिल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून येत्या 28 ऑक्टोबर रोजी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ – आश्विन सोनवणे 
जळगाव शहरचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर या मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये असलेले आश्विन सोनवणे यांना जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपमधून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच ते 28 किंवा 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ – अमोल शिंदे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात अमोल शिंदे यांनी भाजपमधून बंडखोरी करत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते अगदी कमी मताने पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, काही कालावधीनंतर त्यांना पुन्हा एकदा भाजप तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदे यांनी भाजपमधून पुन्हा एकदा बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तसेच येत्या 28 ऑक्टोबर रोजी ते अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.

हेही वाचा : MLA Kishor Appa Interview : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची स्फोटक मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: a t patilamol shindeashwin sonawanebjpmarathi newsrebellionrebellion in bjpshirish chaudharyvidhansabha electionvidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page