• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

एसएसएमएम महाविद्यालयात महसूल सप्ताह साजरा, वाचा सविस्तर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 3, 2023
in पाचोरा, जळगाव जिल्हा
एसएसएमएम महाविद्यालयात महसूल सप्ताह साजरा, वाचा सविस्तर

पाचोरा, 3 ऑगस्ट : तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे पाचोरा तालुका महसूल विभागाच्या वतीने महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महसूल प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यात आली. नवीन मतदार नोंदणी संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देऊन फॉर्म भरून घेण्यात आले.

 

महसूल प्रशासनाच्या वतीने पाचोर्‍याचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, गटशिक्षणाधिकारी गिरीश जगताप यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी केले. पाचोर्‍याचे उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांविषयी सखोल मार्गदर्शन केले. तर शासनाच्या वेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण विभाग सातत्याने कार्यरत आहे, असे मत पाचोर्‍याचे गटशिक्षणाधिकारी गिरीश जगताप यांनी व्यक्त केले.

 

महसूल विभागातील अधिकाऱ्यांसोबत प्राध्यापाकांसह विद्यार्थी

 

 

महसूल प्रशासनाच्या वतीने पाचोरा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी डोमेसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, आधारकार्ड अपडेट यासंबंधी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाचोरा तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे.

 

या कार्यक्रमासाठी आरोग्य विभागाच्या वतीने डॉ देवेंद्र पाटील व डॉ लोकेश सोनवणे हे आरोग्य शिबिरासाठी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी केले तर प्रा. डॉ. कमलाकर इंगळे यांनी आभार मानले.

 

या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार रणजीत पाटील, त्यासोबतच महसूल विभागातील सर्व पदाधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा जी बी पाटील, पर्यवेक्षक प्रा एस एस पाटील, डॉ जे पी बडगुजर, प्रा स्वप्नील भोसले, तालुका क्रीडा समन्वयक प्रा गिरीश पाटील, प्रा योगेश पुरी, प्रा डॉ माणिक पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachorapachora newsssmm college news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

February 1, 2026
अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page