• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मराठी पत्रकार दिन : IIMC अमरावतीमध्ये 6 जानेवारीला ‘संपादक संवाद’ कार्यक्रम

महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी, दै. लोकमत आणि तरुण भारतचे संपादक करणार मार्गदर्शन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 5, 2023
in महाराष्ट्र
मराठी पत्रकार दिन : IIMC अमरावतीमध्ये 6 जानेवारीला ‘संपादक संवाद’ कार्यक्रम

अमरावती, 5 जानेवारी : दिवंगत बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 या दिवशी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. हा दिवस महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय जनसंचार संस्थान तर्फे याच मराठी पत्रकार दिनानिमित्य ‘संपादक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थानचे महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी (दिल्ली) यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने आणि दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेव हे विद्यार्थाना ‘मराठी पत्रकारितेचे बदलते स्वरूप’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

भारतीय जनसंचार संस्थानच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्राच्या वतीने उद्या शुक्रवारी दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता मराठी पत्रकार दिनानिमित्य ‘संपादक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहात होणार आहे. याप्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. विजयकुमार चौबे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनसंचार संस्थानचे पश्चिम क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती राहणार आहे. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख आणि मराठी व हिंदी भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. मोना चिमोटे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन – 

‘संपादक संवाद’ हा उपक्रम मराठी पत्रकारिता दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात आला आहे. मराठीचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या नावाने मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले होते. त्यांचा कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्रात दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्याने भारतीय जनसंचार संस्थानच्या अमरावती केंद्राच्या वतीने मराठी पत्रकार दिनी ‘संपादक संवाद’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातील विविध प्रसारमाध्यमाचे संपादक विद्यार्थ्यांशी वेळोवेळी संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमाचा विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार तसेच इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनसंचार संस्थानचे पश्चिम क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती यांच्यासह प्रा. अनिल जाधव, डॉ. राजेश कुशवाहा, डॉ विनोद निताळे, डॉ आशिष दुबे, संजय पाखोडे आदींनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: amravati newsiimc amravatiiimc amravati latest newsiimc newsmarathi patrakar din

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page