नवी दिल्ली – एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी कृतज्ञ असायला पाहिजे होतं. ठिक आहे, तुम्ही सोडून गेलात, तुमचे मतभेद झालेले आहेत, आम्ही तुमच्यावर टीका करतो, तुम्ही आमच्यावर करता. पण ज्या पद्धतीची भाषा तुम्ही उद्धव ठाकरेंविषयी वापरत आहात, स्वत:चं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. ज्यादिवशी मोदी आणि शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, छप्पर उडालेलं असेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल हा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहटीच्या कामाख्या देवीच्या मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन बसून करायला हवा, अशी टीका शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली.
एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांना आयुष्यात जे काही मिळालं ते उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख झाल्यावर मिळालं. त्याआधी त्यांना फार काही मिळालं नाही. ते फार सक्रिय पण नव्हते. पण एकनाथ शिंदे यांना सर्वकाही उद्धव ठाकरेंच्या मेहरबानीतूनच मिळालं आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
काय म्हणाले संजय राऊत –
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना या चार अक्षरामुळे आम्ही निर्माण झालो आणि विशेषत: एकनाथ शिंदे हे तर उद्धव ठाकरेंचं प्रॉडक्शन आहे. आम्ही सर्व बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले लोकं आहोत. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांना आयुष्यात जे काही मिळालं ते उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख झाल्यावर मिळालं. त्याआधी त्यांना फार काही मिळालं नाही. ते फार सक्रिय पण नव्हते. पण एकनाथ शिंदे यांना सर्वकाही उद्धव ठाकरेंच्या मेहरबानीतूनच मिळालं आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी कृतज्ञ असायला पाहिजे होतं. ठिक आहे, तुम्ही सोडून गेलात, तुमचे मतभेद झालेले आहेत, आम्ही तुमच्यावर टीका करतो, तुम्ही आमच्यावर करता. पण ज्या पद्धतीची भाषा तुम्ही उद्धव ठाकरेंविषयी वापरत आहात, स्वत:चं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. ज्यादिवशी मोदी आणि शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, छप्पर उडालेलं असेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल हा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहटीच्या कामाख्या देवीच्या मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन बसून करायला हवा, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
आज एकनाथ शिंदे हे जे त्यांचं स्वत:चं सत्तेचं वजन दाखवत आहेत, त्यांचं मूळ उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऊर्जेत आहे. ही अशी ऊर्जा त्यांना देऊ नका, हा माणूस घात करेल, हे सांगणारे ठाण्यातील आमदार, खासदार लोकं आज त्यांच्याच अवतीभोवती आहेत, असा दावाही संजय राऊतांनी केला. तसेच एकनाथ शिंदेंनी जपून पाऊले टाकावी, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. राज्यकर्त्याने जर टीका सहन केली तर तो दोन पाऊल अधिक पुढे जाते, असेही ते यावेळी म्हणाले.
छगन भुजबळ यांनी ते पथ्य पाळलं. गणेश नाईक यांचं मी कौतुक करतो. गणेश नाईक यांनीही पक्ष सोडल्यावर बाळसाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली नाही. कारण, ते कृतज्ञ होते. बरेच लोकं कृतज्ञता पाळतात की, मला या पक्षानं भरभरुन दिलंय, अशी खूप लोकं मी पाहिली, जे आज शिवसेनेत नाहीत पण बाहेर गेली आणि ठाकरे कुटुंबाने तुम्हाला दिलं म्हणून तुमची आज किंमत वाढली नाहीतर मोदी, शहा तुम्हाला दारात उभं करणार नाही. मोदी, शहा आणि फडणवीस तुम्हाला दारात उभं करणार नाहीत. मला माहितीये त्यांची नियत काय आहे.
शिवसेना फोडण्याची तुमची क्षमता होती, म्हणून त्यांनी तुम्हाला जवळ केलं. तुमच्यामध्ये फार मोठी कर्तबगारी किंवा महाराष्ट्रासाठी, देशासाठी फार मोठं सामाजिक राष्ट्रकार्य केलं म्हणून त्यांनी तुम्हाला आश्रय दिला नाही. तुम्ही त्यांचे आश्रित आहात, ते तुम्ही शिवसेना पैशाच्या ताकदीवर फोडू शकल्यामुळे, या शब्दात संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला.