मुंबई, 16 फेब्रुवारी : दोन तास ईडी आणि सीबीआय आमच्या ताब्यात द्या. अमित शहा हे देखील मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. दरम्यान, ठाकरे गटातून होत असलेली गळती ही ईडी-सीबीआयच्या भीतीने होत असल्याचेही राऊत म्हणाले आहेत. मुंबईत आज सकाळी ते माध्यमांसोबत बोलत होते.
संजय राऊत काय म्हणाले? –
राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबविले जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून राजन साळवींनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावरून ठाकरे गटाला धक्का बसलाय. अशातच आता ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार टीका केलीय.
View this post on Instagram

आज सत्ता म्हणून ऑपरेशन. उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं दुकान खाली होईल. सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका, अशा जहरी भाषेत राऊतांनी टीका केलीय. सत्ता आम्ही सुद्धा भोगलीय. पण इतक्या विकृत पद्धतीने आम्ही कधी सत्ता राबविली नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय ताब्यात द्या. अमित शहा हे देखील मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. बावनकुळेंपासून सर्वच कलानगरच्या रांगेत प्रवेशासाठी दिसतील, असेही राऊत म्हणाले आहेत.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत






